Ind vs Eng T20: इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार इऑन मॉर्गनने टॉस जिकंत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

भारत- इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुध्द इंग्लंड टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार इऑन मॉर्गनने टॉस जिकंत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवस-रात्र सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची धडाकेबाज फलंदाजी पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.

कर्णधार विराट कोहलीने सलामीला के. एल. राहुलसोबत रोहित शर्माऐवजी शिखर धवन येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र टीम इंडियातील प्रसिध्द फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.  अक्षर पटेलला भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

टीम इंडिया- के.एल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल

टीम इंग्लड- जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलन, जॉनी बेयरस्टो, इयॉन मॉर्गन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मार्क वूड बेन स्टोक्स.

   
 

संबंधित बातम्या