Ind vs Eng T20: पंतचा अफलातून षटकार; केविन पीटरसनने केलं कौतुक

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले असताना पंतने त्याच्या शैलीत लगावलेला षटकार सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

भारत- इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुध्द इंग्लंड टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार इऑन मॉर्गनने टॉस जिकंल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवस-रात्र सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची धडाकेबाज फलंदाजी पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना असतानाच टीम इंडियाला सुरुवातीलाच 3 मोठे धक्के बसले आहेत.

सलामीला के. एल. राहुल 1 धावसंख्या काढून बाद झाला. दुसऱ्या षटकात बसलेल्या धक्क्यातून सावरत असतानाच कर्णधार विराट कोहली जॉर्डनच्या बॉलिंगवर खाते न खोललताच झेल बाद झाला. य़ानंतर शिखर धवन ऋषभ  पंतसोबत डाव सावरेल असं दिसत असतानाच शिखर धवनने 12 चेंडूत फक्त 4 धावा काढून तंबूचा रस्ता धरला. इंग्लडचा गोलंदाज वूडने त्याचा त्रिफळा उडवला.

Ind vs Eng T20: टीम इंडियाची खराब सुरुवात, 20 धावात 3 गडी बाद!

टीम इंडियाच्या खराब खेळीमुळे 20 धावात तीन गडी बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने भारतीय संघाचा डाव काहीसा सावरला. एकिकडे झटपट विकेट जात असतानाच दुसरीकडे ऋषभ पंत मात्र त्याच्या अनोख्या शैलीत खेळताना दिसला. कोणत्याही स्वरुपाचं दडपण न घेता त्याने खेळ सुरु ठेवला. भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले असताना पंतने त्याच्या शैलीत लगावलेला षटकार सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

यातच इंग्लडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पंतचा फटका क्रिकेटमधला सर्वोत्तम फटका असल्याचे म्हटले आहे. जगातील सर्वोत्तम गोलदांज असणारा जोफ्रा आर्चर सामन्यातील चौथे षटक टाकत होता. त्यावेळी पंत पाचव्या चेंडूवर फलंदाजी करत होता. आर्चरने टाकलेल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारला. आणि चेंडूने थेट स्टम्पच्या मागे षटकार गेला. हा फटका पाहून आर्चरसह इंग्लडच्या अनेक खेळाडू यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पंतच्या षटकारवर केविन पीटरसनने ट्विटरच्या माध्यमनातून प्रतिक्रिया  दिली आहे, ''क्रिकेटमधील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम फटका मारण्यात आला आहे. रिव्हर्स स्वीप मारत त्याने हा षटकार मारला आहे,'' असं ट्विट पीटरसनने केले आहे. 

 

संबंधित बातम्या