IND vs ENG: कसोटीत पास होण्यासाठी टीम इंडियाचा 'नेट प्लॅन'

टीम इंडियाच्या (Team India) 21 सदस्यीय संघामध्ये 6 जलदगती गोलंदाज तर 4 स्पिन ऑलराउंडर आहेत. या सर्वांनी सरावास सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारत 3 जलदगती गोलंदाज आणि 2 स्पिन गोलंदाजांसह उतरणार आहे.
भारताचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात येणार आहे.
भारताचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात येणार आहे. Dainik Gomantak

इंग्लंडमध्ये (England) टीम इंडियाचे (Team India) गोलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत. भारताचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅममध्ये (Nottingham) खेळण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय गोलंदाज नेटमध्ये आपला घाम गाळत आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर या जलदगती गोलंदाजांसह रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा हे देखील आहेत. यात मोहम्मद शमीला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता दाट आहे.

टीम इंडियाच्या 21 सदस्यीय संघामध्ये 6 जलदगती गोलंदाज तर 4 स्पिन ऑलराउंडर आहेत. या सर्वांनी सरावास सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारत 3 जलदगती गोलंदाज आणि 2 स्पिन गोलंदाजांसह उतरणार आहे.

भारताचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात येणार आहे.
IND vs ENG: ऋषभ पंत कोरोना मुक्त, लवकरच होणार भारतीय संघात सामिल

बुमराहची हरविलेली लय

2019 मध्ये झालेल्या दुखापतीनंतर बुमराहचा फॉर्म खराब सुरु आहे. मागील 5 कसोटी सामन्यात त्याने 10 इनिंगमध्ये फक्त 13 विकेट घेतल्या आहेत. तर मागील 4 सामन्यात त्याला एकही विकेट मिळालेली नाही.

उमेशची सराव सामन्यात चमकदार कामगिरी

उमेश यादवने काउंटी सिलेक्ट इलेव्हन विरुध्द चांगली गोलंदाजी करत 3 गडी बाद केले आहेत. त्याने मागील 10 सामन्यात त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.

भारताचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात येणार आहे.
Ind vs Eng: सुर्यकुमारच्या रुपाने भारतीय संघासाठी होणार का नवीन सुर्योदय

ऑस्ट्रेलियात सिराजची जबरदस्त कामगिरी

मोहम्मद सिराजने आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून, 16 विकेट घेतल्या आहेत. सिराजने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली होती.

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघ
विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे (उपकप्तान), मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, अभिनन्यु ईश्वरन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), ईशांत शर्मा, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकुर, हनुमा विहारी, उमेश यादव और सूर्यकुमार यादव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com