IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध  टी -20 सामन्यात थर्ड अंपायरने 'ते' 2 चुकीचे निर्णय दिल्याने फॅन्स भडकले
IND vs ENG Third umpire Virender Sharma two wrong decisions in the T20I match against Team India were strongly objected by Indian cricket fans

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध टी -20 सामन्यात थर्ड अंपायरने 'ते' 2 चुकीचे निर्णय दिल्याने फॅन्स भडकले

नवी दिल्लीः भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी -20 सामन्यात अत्यंत खराब अंपायरिंग बघायला मिळाली. या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात थर्ड अंपायर वीरेंद्र शर्माने असे 2 निर्णय दिले.

थर्ड अंपायरची पहिली चूक

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक झाल्यानंतर  जेव्हा तो एका मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल करीत होते, तेव्हा पंथर्ड अंपायरच्या  चुकीच्या निर्णयाचा फटका त्याला सहन करावा लागला. 14 व्या षटकामध्ये डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेताना त्याचे हात मैदानाला टेकले होते. तसेच व्हिडीओ रिप्लेमध्ये त्याने झेल पकडताना चेंडू जमीनीला टेकल्याचं दिसत होतं. मात्र पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे सांगत सूर्यकुमारला सॉफ्ट सिग्नलच्याआधारे बाद ठरवलं. 

पंच वीरेंद्र शर्माची दुसरी चूक

19 व्या षटकामध्ये जोफ्रा आर्चरने टाकलेल्या वॉशिंग्टन सुंदरने मारलेला फटका अदील रशीदने झेलला तेव्हा त्याच्या पायांचा सीमारेषेला स्पर्श झाला होता. मात्र यामध्येही थर्ड अंपायर यांनी मैदानावरील पंचांचाच निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला.

थर्ड अंपायरवर चाहत्यांचा रोष भडकला

या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान थर्ड अंपायर वीरेंद्र शर्माच्या दोन चुकीच्या निर्णयांवर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी कडक आक्षेप घेतला. ट्विटरवर सतत थर्ड अंपायर वीरेंद्र शर्मा ट्रोल होत आहेत, अगदी माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

त्याचबरोबर अभिनेता रणवीर सिंगनेही ट्विटवरुन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करताना, झेल सुटला होता, चेंडू मैदानाला टेकला होता असं ट्विट केलं आहे. दरम्यान भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणनेही मलान झेल पकडताना स्क्रीनशॉर्ट शेअर करत हा निर्णय बाद असा कसा असू शकतो असा प्रश्न थर्ड अंपायरला विचारलाय .


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com