IND vs ENG: लाजिरवाण्या पराभवानंतर विराट कोहली म्हणाला...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा खेळ 192 धावांवर संपला. दुसर्‍या डावात कर्णधार कोहलीने 72 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिलने 50 धावांचे योगदान दिले. पराभवा नंतर कॅप्टन कोहलीने काय काय प्रतिक्रिया दिली हे आपण जाणून घेवूया.

चेन्नई: चेन्नई मध्ये पार पडलेल्या इंडिया इंग्लड कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना कराव लागाला आहे. इंग्लडने भारतीय संघाचा 277 धावांनी पराभव करत चार कसोटीच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लड संघाने भारतावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली आहे. भारताला पहिल्या कसोटीत कशामुळे पराभवास सामोरे जावे लागले याची मिंमासा केल्यास अनेक कारणे आपल्या समोर येतील. चेन्नईच्या मैदानावर नाणेफेक जिंकत कर्णधार जो रुटने प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या जो रूटने 218 एवढी मोठी धावसंख्या उभारत संघाला बळकट केले. प्रत्युत्तरादाखल भारताला पहिल्या डावात फक्त 337 धावा करता आल्या. अशा प्रकारे, इंग्लंड संघाला 241 धावांची आघाडी मिळाली.

त्याचवेळी इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर कमी झाला. भारताकडून आर अश्विनने 61 धावा देऊन 6 गडी बाद केले. यासह भारताला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा खेळ 192 धावांवर संपला. दुसर्‍या डावात कर्णधार कोहलीने 72 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिलने 50 धावांचे योगदान दिले. पराभवा नंतर कॅप्टन कोहलीने काय काय प्रतिक्रिया दिली हे आपण जाणून घेवूया.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने विकेटची गती कमी असल्याचे सांगितले. तो म्हणाला, 'लवकर विकेट घेण्यास वेळ झाला. पहिल्या दोन दिवसांत काहीही झाले नाही, पीच फलंदाजीसाठी अनुकूल होती. इंग्लंड संघ विपरीत काळातही धीर धरून होता, ते क्रीजवर ठेहराव धरून राहिले. आम्ही दुसऱ्या डावात झालेल्या चुकांवरून शिकलो, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

"कसोटी क्रिकेट हे एक कठीण फॉर्मेट आहे आणि टिम इंग्लंड आमच्यापेक्षा चांगल्या तयारीत होती. संपूर्ण कसोटी सामन्यात इंग्लंडने आमच्यापेक्षा अधिक प्रोफोशनल खेळ खेळला आणि आमच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी बजावली. यात काही शंका नाही की आम्ही विरोधी संघावर दबाव आणू शकलो नाही. आम्ही या पराभवासाठी कोणतेही निमित्त पुढे करणार नाही. पण पुढील तीन कसोटी सामन्यांना आम्ही नक्कीच प्रतिउत्तर देवू," असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. 

दरम्यान, कर्णधार विराट कोहली,अजिंक्य राहणे,चेतेश्वर पुजारा यांना लवकर बाद करण्यात इंग्लडच्या फिरकीपटूंना यश आले. पहिल्या कसोटीत इंग्लडच्या फिरकीपटूंनी एकूण 11 बळी घेतले होते. अजिंक्य राहणे आणि रोहीत शर्मा यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लडच्या संघाला कर्णधार जो रुट याच्या नेतृत्वाखाली भारताविरुध्दाच्या पहिल्या कसोटीत विजय संपादन करता आला. रुटने संघातील गोलंदाजांचा योग्यरित्या वापर करत संघाला विजय मिळवून दिला. सामना दरम्यान असे अनेक निर्णय घेत रुटने इंग्लडला विजय मिळवून दिला.

INDvsENG : पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत; इंग्लंडची 1-0 अशी आघाडी -

 

 

संबंधित बातम्या