Ind vs Eng:  एकीकडे पांड्य़ा ब्रदर्स तर दुसरीकडे करन ब्रदर्स

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या तर, इंग्लंडकडून सॅम आणि टॉम करन मैदानात उतरले.

पुणे: भारत-इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन बंधूची जोडी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या तर, इंग्लंडकडून सॅम आणि टॉम करन मैदानात उतरले. कृणालने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात या सामन्याने केली आहे.  पांड्या बंधू वन डे सामन्यात एकत्र खेळणारी तिसरी जोडी आहे. त्या आगोदर सुरिंदर अमरनाथ, इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी वन डे सामन्यामधून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. (Ind vs Ing Pandya Brothers on one side and Karan Brothers on the other)

भारताकडून अमरनाथ बंधूनी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर पठाण बंधूनी भारताकडून वनडे आणि टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. तर दुसरीकडे टॉम करन आणि सॅम करन यांनी यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये श्रीलंकेच्या विरुध्द इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

गोंधळ निर्माण होत असल्याचे म्हणत 'डीआरएस'वरून विराट कोहली भडकला

विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात खेळणारे पांड्या ब्रदर्स आणि करन ब्रदर्स अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये मोडते. त्यापैकी कृणाल हा फिरकी गोलंदाज तर टॉम, सॅम आणि हार्दीक वेगवान गोलंदाज आहेत. एदिवसीय सामन्यात पदार्पण करताच कृणालने 31 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 58 धावा काढल्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून कृणाल पांड्याच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. कृणालने 26 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

संबंधित बातम्या