IND vs NZ: टीम इंडियाचा T20 कर्णधार बनणार हा खेळाडू! प्रशिक्षक लक्ष्मणच्या वक्तव्याने खळबळ

India vs New Zealand, T20 Series: व्हीव्हीएस लक्ष्मण हा हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा चाहता झाला आहे.
VVS Laxman
VVS LaxmanDainik Gomantak

IND vs NZ 1st T20: न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत असलेला माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने आपल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. लक्ष्मणने आपल्या एका वक्तव्यातून संकेत दिला की, येत्या काही दिवसांत कोणता खेळाडू रोहित शर्माच्या जागी भारताचा नवा T20 कर्णधार बनू शकतो. व्हीव्हीएस लक्ष्मण हा हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा चाहता झाला आहे. लक्ष्मणचा विश्वास आहे की, हार्दिक पांड्या हा उत्कृष्ट फलंदाज आहे. विशेष म्हणजे, त्याची नेतृत्व करण्याची पद्धत वेगळी आहे.

हा स्टार खेळाडू बनणार टीम इंडियाचा पुढचा T20 कर्णधार!

व्हीव्हीएस लक्ष्मणने यंदाच्या आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्यासोबत (Hardik Pandya) काम केले असून त्याच्या कर्णधारपदाची प्रशंसा केली आहे. या वर्षी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सारख्या नवीन संघाला आयपीएल 2022 चे विजेतेपद मिळवून दिले. पुढील T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळवला जाणार आहे, अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याकडे टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद देण्याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

VVS Laxman
IND vs NZ: भारताविरुद्धच्या वनडे अन् टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा !

प्रशिक्षक लक्ष्मण यांनी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली

न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पहिल्या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला की, 'हार्दिक पांड्या एक जबरदस्त कर्णधार आहे. पांड्याने गुजरात टायटन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. आयपीएलसारख्या (IPL) मोठ्या मंचावर प्रथमच संघाचे कर्णधारपद मिळवणे ही काही छोटी गोष्ट नाही.'

VVS Laxman
IND vs NZ : या महिन्यात रंगणार Team India आणि New Zealand मध्ये सामना; हे आहे वेळापत्रक

शांत आणि संयमी कर्णधार

लक्ष्मण पुढे म्हणाला की, 'मी आयर्लंड मालिकेत हार्दिक पांड्यासोबत वेळ घालवला आहे. हार्दिक पांड्या हा स्वभावाने शांत आणि स्थिरही आहे, जे कर्णधारपदासाठी आवश्यक असते. उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये तुमच्यावर काही वेळा प्रचंड दबाव असतो, अशा परिस्थितीत कर्णधाराने स्थिर राहणे सर्वात महत्त्वाचे असते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com