IND vs NZ: 2nd T20 साठी पांड्याची धाकड Playing 11 तयार, या खेळाडूला मिळणार संधी

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

India vs New Zealand 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबरला ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. T20 विश्वचषक 2022 मधील पराभव विसरुन टीम इंडिया चांगली कामगिरी करु इच्छित आहे. यासाठी कर्णधार हार्दिक पांड्या कोणतीही कसर सोडायला तयार नाही. चला जाणून घेऊया दुसऱ्या T20 सामन्याची प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते?

हे सलामीवीर असू शकतात

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल या दोघांनाही न्यूझीलंड (New Zealand) मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी ईशान किशन आणि शुभमन गिलला सलामीची संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशनने याआधीही सलामीची जबाबदारी पार पाडली आहे.

Hardik Pandya
Ind Vs NZ Match Cancel: मैदानात पावसाचा खेळ; मग ड्रेसिंग रूममध्ये फुटबॉल खेळून क्रिकेटर्सचा टाईमपास

हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर उतरेल

गेल्या दशकात, विराट कोहली टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उदयास आला आहे, परंतु तो न्यूझीलंड मालिकेत खेळत नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. अय्यरमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता आहे.

मिडल ऑर्डर अशीच राहू शकते

सूर्यकुमार यादवने 2022 च्या T20 विश्वचषकात शानदार कामगिरी करुन सर्वांची मने जिंकली आहेत. अशा स्थितीत त्याला चौथ्या क्रमांकावर उतरण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवली जाऊ शकते. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरु शकतो. आयपीएल 2022 नंतर त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे.

Hardik Pandya
Ind Vs Nz T-20: न्युझीलंडविरूद्ध आज पहिली टी-20 लढत; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रक्षेपण

या गोलंदाजांना संधी मिळू शकते

भुवनेश्वर कुमार टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चांगला खेळ दाखवू शकला नाही. अशा स्थितीत तो चांगली गोलंदाजी करण्यासाठी हतबल असेल. त्याला साथ देण्यासाठी हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांना संघात संधी मिळू शकते. यजुवेंद्र चहलला फिरकीची जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरला अष्टपैलू म्हणून स्थान मिळू शकते.

Hardik Pandya
Ind vs Nz T20 Series: पांड्याच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून T20 मालिका, प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल!

दुसऱ्या T20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com