IND vs NZ 3rd ODI: सूर्या बनला सिक्सर किंग! तिसऱ्या वनडेत फ्लॉप ठरुनही केला 'महारेकॉर्ड'

Suryakumar Yadav Records: भारताचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मोठे फटके खेळण्यात माहिर आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो सर्वोत्तम मानला जातो.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Dainik Gomantak

Suryakumar Yadav Records, IND vs NZ 3rd ODI: भारताचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मोठे फटके खेळण्यात माहिर आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो सर्वोत्तम मानला जातो. मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष अशी कामगिरी करता आली नाही. असे असतानाही त्याने षटकारांचा रेकॉर्ड केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुभमन गिलने शतके झळकावली.

इंदूरमध्ये सूर्याची बॅट चालली नाही

इंदूर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये भारताने 50 षटकात 9 गडी गमावून 385 धावा केल्या आहेत. 32 वर्षीय सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट चालली नाही. चाहत्यांना त्याच्याकडून खूप आशा होत्या की, तो मोठी खेळी खेळेल, पण अवघ्या 14 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 9 चेंडूंच्या खेळीत 2 षटकार ठोकले.

तो मैदानात आल्यावर चाहत्यांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्याचे फटके सीमारेषेपलीकडे पडताच उत्साहही वाढला. मात्र तो म्हणावी तशी कामगिरी न करताच परतला.

Suryakumar Yadav
IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियात दोन मोठे बदल, उमरानला संधी; पाहा Playing XI

सूर्यकुमारने 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले

इंदूर वनडेत जरी सूर्यकुमार फ्लॉप ठरला, पण असे असतानाही त्याने आपल्या आक्रमक शैलीने एक रेकॉर्ड केला. यासह सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 षटकार पूर्ण केले. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये 92 षटकार मारले आहेत. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे 8 षटकार आहेत. सूर्यकुमारने टी-20 आणि वनडेमध्ये एकूण 61 डावात 100 षटकार पूर्ण केले.

हार्दिकही मागे

यासह सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नावावर होता. हार्दिकने 101 डावात 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते. त्याचबरोबर केएल राहुल आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे, ज्याने 129 डावांमध्ये हा पराक्रम केला.

Suryakumar Yadav
IND vs NZ: जोडी नंबर वन! गिल-रोहितने शतकं ठोकत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, सेहवाग-गंभीरलाही टाकलं मागे

विशेष म्हणजे, संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत खूप मागे आहे. रोहित आणि माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर 166 डावांमध्ये हा पराक्रम केला. त्याचबरोबर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 132 डावात 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com