India Vs New Zealand: टीम इंडिया 'अजेय' घरच्या मैदानावर कायम ठेवला शानदार रेकॉर्ड

India Vs New Zealand 2nd ODI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India Vs New Zealand 2nd ODI: भारताने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमचे उद्घाटन केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना या स्टेडियमवर खेळवला गेला, जो येथे होणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना देखील होता. या ऐतिहासिक प्रसंगी भारतीय संघाने रायपूरला एक संस्मरणीय भेट दिली.

या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या शानदार विजयाच्या जोरावर टीम इंडियाने या मालिकेतही 2-1 अशी अजेय आघाडी मिळवली.

भारताने सलग सातव्या मालिका विजयाची नोंद केली

रायपूरमधील या उत्कृष्ट विजयाने न्यूझीलंडविरुद्धच्या अजिंक्य रथाला भारताने ब्रेक लावला. वनडे फॉरमॅटमध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) भारतीय संघाचा हा सलग सातवा मालिका विजय आहे. भारताने 1988-89 मध्ये प्रथमच न्यूझीलंडचे एकदिवसीय मालिकेत यजमानपद भूषवले, जी त्याने 4-0 ने जिंकली.

Team India
India Vs New Zealand: न्यूझीलंडच्या फंलदाजांची शमीने ठेचली नांगी, पाहा Vedio

यानंतर, 1995-96 मध्ये 3-2, 1999 मध्ये 3-2, 2010 मध्ये 5-0, 2016 मध्ये 3-2 आणि 2017-18 मध्ये 2-1 असा विजय मिळवला. सध्याच्या मालिकेत भारताने (India) दोन सामन्यांनंतर 2-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

भारतीय भूमीवर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा इतिहास

1988-89: टीम इंडिया 4-0 ने जिंकली

1995-96: टीम इंडिया 3-3 ने जिंकली

1999: टीम इंडिया 3-2 ने जिंकली

Team India
India vs New Zealand: दुसऱ्या वनडेत किवींना चॅलेंज देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या Playing XI

2010: टीम इंडिया 5-0 ने जिंकली

2016-17: टीम इंडिया 3-2 ने जिंकली

2017-18: टीम इंडिया 2-1 ने जिंकली

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच धुमाकूळ घातला. मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 बळी घेतले. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 34.3 षटकांत 108 धावांत गुंडाळला. त्यांचे अव्वल 5 फलंदाज 2 अंकी धावसंख्या गाठू शकले नाहीत.

Team India
India vs New Zealand: द्विशतक एक, रेकॉर्ड्स अनेक! शुभमन गिल भल्याभल्या दिग्गजांना पडला भारी

तसेच, सामना आणि मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर 109 धावांचे छोटे लक्ष्य होते. कर्णधार रोहित आणि शुभमन गिल या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने 50 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 51 धावा केल्या. रोहित आऊट झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 72 रन्स होता म्हणजे विजय फक्त 37 रन्स दूर होता.

विराट कोहलीला एक छोटी आणि नाबाद खेळी खेळण्याची संधी होती पण त्याला ती करता आली नाही. कोहलीला फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने 11 धावा केल्यानंतर यष्टीचीत केले. भारताने 20.1 षटकात सामना जिंकला तेव्हा शुभमन गिल (40) आणि इशान किशन (8) क्रीजवर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com