IND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

भारतीय क्रिकेट बोर्डाने सराव सत्राचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, आम्ही प्रथमच एकत्र सराव केल्याने सर्वजण उत्साहात आहेत. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

साऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून पासून भारत (India) आणि न्यूझीलंड (New zealand) यांच्या जागतिक कसोटी क्रिकेटचा अंतिम (World Test Cricket Final) सामना खेळण्यात येणार आहे. त्यासाठी टीम इंडियाने (Team India) सरावाला सुरुवात केली आहे. गुरुवारी भारतीय संघाने बाऊलगतच्या मैदानावर प्रथमच एकत्र येऊन सराव (Practice) केला आहे.

विलगीकरणानंतर भारतीय खेळाडू आज एकत्र मैदानात सरावासाठी उतरले. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सराव सत्राचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, आम्ही प्रथमच एकत्र सराव केल्याने सर्वजण उत्साहात आहेत. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांनाही इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी

आज नेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत यांनी कसून फलंदाजीचा सराव केला. तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रात बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी गोलंदाजीचा सराव केला. या सरावानंतर खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाच्या सरावात प्रशिक्षक श्रीधरने यांच्या सोबत घाम गाळला.

भारतीय संघाने अंतिम सामन्यातील ११ खेळाडू निवडण्याचे काम सुरु केले आहे. त्यात एक रिपोर्टमध्ये मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये इशांत शर्मा ऐवजी जागा मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांचे खेळणे पक्के मानले जात आहे.    

 

संबंधित बातम्या