'हिट मॅन' बनला सिक्सर किंग !

रोहित (Rohit) अॅन्ड कंपनीने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने दणदणीत विजय तर मिळवलाच पण या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी विक्रमांची धमाल केली. यासह रोहित अॅन्ड कंपनीने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

रोहित सर्वात जलद 450 आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा खेळाडू ठरला

रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या खेळाडूंनाही करता आला नाही. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 षटकार ठोकण्याचा विक्रम हिट मॅनच्या नावावर आहे. या सामन्यादरम्यान, रोहितने ट्रेंट बोल्टविरुद्ध (Trent Bolt) पहिला षटकार मारुन हा विक्रम केला होता, त्याने आपल्या डावात एकूण 5 षटकार ठोकले होते. त्याच्याशिवाय ख्रिस गेल (Chris Gayle) (553) आणि शाहिद आफ्रिदी (476) यांनी 450 आंतरराष्ट्रीय षटकार ठोकले आहेत. त्याचा वेगवान डाव टीम साऊथीने 55 धावांवर रोखला.

Rohit Sharma
IND vs NZ: टीम इंडिया व्हाईट वॉश साठी सज्ज !
  • ख्रिस गेल - 553 षटकार (वेस्ट इंडिज)

  • शाहिद आफ्रिदी - 476 षटकार (पाकिस्तान)

  • रोहित शर्मा - 450 षटकार (भारत)

  • ब्रेंडन मॅक्युलम - 398 षटकार (NZ)

  • मार्टिन गुप्टिल - 363 षटकार (NZ)

  • एमएस धोनी - 359 षटकार (भारत)

  • क्रिस गेल- 553 छक्के (वेस्टइंडीज)

T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुप्टिलच्या नावावर

सामन्यात प्रवेश करताच मार्टिन गुप्टिलच्या निशाण्यावर होता, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 11 धावा करुन कोहलीला मागे टाकताच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता गुप्टिलने आपल्या नावावर 3248 धावा नोंदवल्या आहेत. तर तो या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गुप्टिलने 111 डावांमध्ये हा पराक्रम केला असून यादरम्यान त्याने 19 अर्धशतकेही केली आहेत.

Rohit Sharma
IND vs NZ: सामन्यानंतर द्रविड यांच्या कोचिंगवर आश्विनचे भाष्य

भुवनेश्वरची रेकॉर्डब्रेक फटकेबाजी

भारतीय संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार किवींविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. त्यानंतर किवी फलंदाजांनी त्याला जोरदार फटकेबाजी केली आणि 3 चौकार मारत 14 धावा केल्या. अशाप्रकारे भुवी देशांतर्गत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आपल्या स्पेलमध्ये 39 धावांत 1 बळी घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com