IND vs NZ WTC Final: अंतिम सामन्यावर पावसाचे सावट 

IND vs NZ WTC Final: अंतिम सामन्यावर पावसाचे सावट 
WTC Final

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा सगळ्या क्रिकेट चाहत्यांना लागली असुन हा सामना आज दुपारी 3 वाजता इंग्लंडच्या साऊथेप्टम येथे सुरू होणार आहे. मात्र भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या  पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं चिन्ह दिसत आहेत. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला असून  या सामन्यात पाऊस त्रासदायी ठरू शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहेIND vs NZ WTC Final Heavy Rain during the final match.()

इंग्लंड मधील हवामान विभागाने शनिवार आणि रविवार या दोन दिवशी रोजी हवामान खराब असेल असा अंदाज वर्तवला होता मात्र पहिल्याच गुरुवारीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे क्रिकेट रसिकांची चिंता वाढली आहे. WTC फायनलचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होईल.

साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात मानाची  गदा उंचावण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघेही सज्ज आहेत. भारतीय संघ या मैदानावर आधी २ सामने खेळलेला आहे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  साऊथॅम्प्टनचा खराब इतिहास विराट कोहली आणि टीम इंडियाला बदलावा लागेल. 

न्यूझीलंडच्या  संघानी नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये आपण भारता विरुद्ध तैयार आहोत हे दाखवून दिलं. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य  राहणे, चेतेश्वर पुजारा या सारखे अनुभवी खेळाडू आपलं सर्वस्व या अखेरच्या सामन्यात दाखवेल अशी आशा आहे. दुसऱ्या बाजुला कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, देवोन कोनवाय, टॉम लाथम इ. हे देखील आपल्या संघाला टेस्टचा विश्वचषक जिंकून देण्याच्या तैयारीनेच मैदानात उतरतील.जर भारत, कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या कसोटीबद्दलबघायला गेलो तर दोन्ही संघाची आतापर्यंत 5 वेळा भिडत झाली आहे. त्यापैकी भारताने 3 वेळा विजय मिळवला, तर किवींनी 2 वेळा विजयाची चव चाखता आली आहे. 

भारतीय संघ: विराट कोहली ((कर्णधार)), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

न्यूझीलंड संघ यातुन निवडणार: केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, टॉम लाथम, रॉस टेलर, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी, हेनरी निकोलस, एजाज पटेल, नील वैगनर, बीजे वाटलिंग, विल यंग कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास घडवण्याची ही सुवर्ण संधी आहे. जर भारताने ही लढत जिंकली तर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:च्या नावावर करेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com