Ind Vs Pak Asia Cup 2022: सामना कधी आणि कुठे पाहायचा, संघात कोण खेळणार...

उद्या दुबई स्टेडियमवर भारत-पाकिस्तान संघ आमने सामने
Ind Vs Pak Asia Cup 2022
Ind Vs Pak Asia Cup 2022Twitter

Ind Vs Pak Asia Cup 2022: आशिया कप-2022 शनिवारपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील, हा सामना दुबईत होणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा या सामन्यावर म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. रविवारी दुबई स्टेडियमवर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार आहेत. 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत.

• भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आहे?

आशिया कप 2022 मध्ये हा सामना रविवारी (28 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

• हा सामना कुठे होत आहे?

यावेळी आशिया चषक यूएईमध्ये होत असून, भारत-पाकिस्तान सामना दुबई स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंका हा आशिया कपचा अधिकृत आयोजक आहे.

• मी भारत-पाकिस्तान सामना कोठे पाहू शकतो?

आशिया चषकाचे प्रसारण स्टार नेटवर्कवर होत असल्याने स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर थेट सामना पाहायला मिळणार आहे.

• T20 मध्ये भारत-पाकिस्तानचा रेकॉर्ड काय आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 6 भारताने, तर 2 पाकिस्तानने जिंकले होते. एक सामना बरोबरीत राहिला, तोही भारताने अखेर जिंकला.

• आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा विक्रम काय आहे?

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने 7 तर पाकिस्तानने 5 जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

Ind Vs Pak Asia Cup 2022
IND VS PAK: या वेगवान गोलंदाजाला पाकिस्तानच्या संघात मिळाले स्थान

आशिया कपसाठी दोन संघांतील प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

Stand by:श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com