
IND vs PAK ODI WC 2023: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम ओळखले जाते. 15 ऑक्टोबर रोजी हे मैदान जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट सामन्याचे साक्षीदार होणार आहे.
2023 च्या वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना या स्टेडियमवर होणार आहे. यावेळी संपूर्ण जग या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
याआधीही येथे अनेक सामने झाले आणि यंदाच्या विश्वचषकातही होणार असले, तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा काही औरच आहे.
वनडे विश्वचषक स्पर्धेला अजून वेळ आहे, पण या मैदानावर खेळले गेलेले सामने, विशेषत: एकदिवसीय सामन्यांबद्दल जाणून घेणे महत्वाचे असेल.
भारत आणि पाकिस्तानचे संघ 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून आमनेसामने असतील. अहमदाबादमधील या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख 32 हजार एवढी आहे.
विशेष म्हणजे, टीम इंडियाने (Team India) येथे सर्वात मोठी धावसंख्या पाकिस्तानविरुद्धच केली आहे. तेव्हा त्याचे नाव मोटेरा स्टेडियम असे होते.
लाल आणि काळ्या मातीच्या खेळपट्ट्या इथे पाहायला मिळतात. यावेळीही सपाट ट्रॅक असावा, जेणेकरुन भरपूर धावा होतील आणि प्रेक्षकांना पूर्ण आनंद मिळेल.
अहमदाबादमध्ये वनडेतील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेने 2010 साली टीम इंडियाविरुद्ध केली होती, जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन विकेट गमावून 365 धावा केल्या होत्या.
त्याचवेळी, 2005 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सहा विकेट्सवर 315 धावा केल्या होत्या. या स्टेडियमवर कोणत्याही संघाविरुद्ध भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे.
जर येथे आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी दहा जिंकले आहेत, तर आठमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. हे आकडे दर्शवतात की, रेकॉर्ड अनुकूल आहेत.
दुसरीकडे, 2005 मध्ये जेव्हा पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा टीम इंडियाचे कर्णधारपद सौरव गांगुलीच्या हातात होते. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 गडी गमावून 315 धावा केल्या होत्या.
यामध्ये सचिन तेंडुलकरने 130 चेंडूत 123 धावांची शानदार खेळी केली. मात्र अन्य एकाही फलंदाजाला अर्धशतकही गाठता आले नव्हते.
प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने सात विकेट्सवर आवश्यक धावा केल्या आणि सामना तीन विकेटने जिंकला. पाकिस्तानसाठी तत्कालीन कर्णधार इंझमाम
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.