IND vs SA 2nd T20: कटकमध्ये तिकिटावरुन महिलांची हाणामारी, पाहा Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND vs SA 2nd T20: कटकमध्ये तिकिटावरुन महिलांची हाणामारी, पाहा Video
CuttackDainik Gomantak

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रविवारी 12 जून रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी गुरुवारी तिकीटविक्रीवरुन मोठा गदारोळ झाला. तिकीट खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांची आपापसात हाणामारी झाल्याने तिकीट विक्रीदरम्यान गोंधळ निर्माण झाला. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ind Vs Sa 2nd T20 Fight Between Women Over India Vs South Africa 2nd T20 Tickets In Cuttack Police In Action Watch Video)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिला रांगेतून बाहेर आल्या होत्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला, त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. व्हिडिओमध्ये काही महिला आपापसात भांडताना दिसत आहेत. यानंतर पोलिसांनी (Police) येऊन प्रकरण शांत केले. मात्र, त्यानंतरही वाद सुरुच होता. काही लोक आधी तिकीट काढण्यासाठी रांगेत आले, त्यामुळे बाकीच्यांशी हाणामारी झाली.

Cuttack
IND vs SA T20: ऋषभ पंतने धोनीला मागे टाकत नावावर केला खास विक्रम

कटकमध्ये तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे

कटक (Cuttack) येथील बाराबती स्टेडियमवर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. त्यामुळे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रखरखत्या उन्हातही ते तासन्तास रांगेत उभे राहिल्याने या सामन्याप्रती चाहत्यांची क्रेझ तुमच्या लक्षात आली असेल. अखेर त्यांचा संयम सुटला. कटकचे डीसीपी आणि त्यांची टीमही रांगेत उभ्या असलेल्या लोकांना शांत करताना दिसली. त्यानंतर आता लोक त्यांचे कौतुक करत आहेत.

12 हजार तिकिटांसाठी 40 हजार लोक रांगेत उभे होते

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराबती स्टेडियममध्ये जवळपास 40,000 लोक तिकीट खरेदी करण्यासाठी पोहोचले होते, परंतु केवळ 12,000 तिकिटांचीच विक्री होणार होती. बाराबती स्टेडियमची आसनक्षमता 45 हजार आहे. मात्र, अनेक तिकिटे आधीच विकली गेली आहेत. यावरुन भारत-दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दुसऱ्या सामन्यात स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असू शकते, याचा अंदाज लावता येतो.

Cuttack
IND vs SA: T20 मालिकेपूर्वी KL राहुल आऊट, हा खेळाडू बनला टीम इंडियाचा कर्णधार

नवीन पटनायक यांनी पहिले तिकीट खरेदी केले

याआधी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी दुसऱ्या T20 सामन्याचे पहिले तिकीट खरेदी केले होते. ओडिशा (Odisha) क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज लोचन आणि सचिव संजय बेहरा यांनी नवीन पटनायक यांच्या घरी पोहोचून त्यांना सामन्याचे पहिले तिकीट दिले. दुसरा टी-20 पाहण्यासाठी पटनायकही स्टेडियममध्ये पोहोचू शकतात.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सात विकेट्सनी पराभव झाला होता

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सात विकेट्सनी पराभव झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) 20 षटकांत 4 गडी गमावून 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 19.1 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने 64 आणि रेसी व्हॅन डर ड्युसेनने नाबाद 75 धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com