
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आला. दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना 7 गडी राखून जिंकला. तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गडी गमावून 211 रन्स केल्या आणि प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 5 चेंडू राखून 212 धावा करून सामना जिंकला. (IND vs SA Avesh Khan speed broke the bat)
या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सलग 13 टी-20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम करण्याचे भारताचे स्वप्नही भंगले आहे. या सामन्यात एकेकाळी भारताची पकड खूप मजबूत असायची. भारतीय संघ विश्वविक्रम करेल असेच वाटत होते. पण आवेश खानच्या एका षटकात असे काही घडले ज्यामुळे सामन्याची दिशाच बदलली.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 14 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू वाईड होता. यानंतर पुढच्या तीन चेंडूत एकही रन झाली नाही. तिसरा चेंडू यॉर्कर होता, ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात रॅसीच्या बॅटचे दोन तुकडे झाले. त्यावेळी रासी 26 चेंडूत 22 धावा करत खेळत होता.
यानंतर त्याने आपली बॅट बदलली आणि येथून त्याचा खेळही पूर्णपणे बदलला. दुसनेने धावांचा पाऊस पाडून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. रासीने 46 चेंडूत 75 धावा केल्या तर संघाने हा सामना 7 गडी राखून जिंकला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गडी गमावून 211 धावा पुर्ण केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 5 चेंडू राखून 212 धावा करून सामना आपल्या नावावर केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.