IND VS SA T20: युजी चहल करणार नवा रेकॉर्ड, अश्विनला टाकणार मागे

9 जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेत चहल रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडू शकतो.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak

टीम इंडियाचा (Team India) स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत आपले गोलंदाजी कौशल्य दाखवणार आहे. या मालिकेत चहलही मोठा विक्रम करू शकतो. 9 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत चहल रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडू शकतो. सध्या अश्विन टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरवा आहे. आता चहल हा विक्रम त्याच्या नावावर करू शकतो. (IND VS SA T20 Yuzvendra Chahal to set a new record leaving Ashwin behind)

Yuzvendra Chahal
IND vs SA: 'माझे वडीलही विकेटकीपर होते म्हणून मी...': ऋषभ पंत

अश्विनच्या नावावर 276 विकेट्स आहेत.

अश्विनच्या नावावर आतापर्यंत 282 टी-20 सामन्यात 276 विकेट्स घेतल्या आहेत. चहलने 242 टी-20 सामने खेळले असून 274 विकेट्स आपल्या नावावर आहेत. म्हणजेच अश्विनच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो अवघ्या 2 विकेट्सच दूर आहे आणि तीन विकेट घेताच तो अश्विनला मागे टाकेल.

आयपीएलमध्ये चहलला मिळाली पर्पल कॅप

या आयपीएलमध्ये चहलने शानदार गोलंदाजी करत स्पर्धेत एकूण 27 विकेट घेत पर्पल कॅप मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत युझवेंद्र चहल प्रोटीज संघासाठी अतिशय धोकादायक गोलंदाज ठरू शकतो असे म्हटले जात आहे. आयपीएलच्या या मोसमात चहलनेही दिल्लीविरुद्ध हॅट्रिक घेत सामन्याचा मार्ग स्वतःच बदलून टाकला आहे.

Yuzvendra Chahal
न्यूझीलंडला मोठा धक्का; कॉलिन डी ग्रँडहोम कसोटी मालिकेतून बाहेर

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) मागे टाकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत तीन विकेट घेऊन सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनणार आहे आणि अश्विनचा विक्रम मोडीत निघणे जवळपास निश्चित आहे कारण या मालिकेत एकूण 5 T20 सामने खेळावे लागणार आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी चहलकडे वेळ असणार आहे. युझवेंद्र चहलने आता भारतासाठी 54 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 68 विकेट्स घेतले आहेत आणि IPL मधील 131 सामन्यांमध्ये 166 विकेट्स घेतले आहेत. चहलने हरियाणाकडून देशांतर्गत टी-20 क्रिकेट खेळताना एकूण 40 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com