IND vs SL: दुनिथ वेलालागेने 'ड्रीम विकेट'बाबत केला खुलासा, म्हणाला...

Dunith Wellalage: श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागेच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी कात टाकली. वेलालागेने शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 40 धावा देत 5 बळी घेतले.
Dunith Wellalage Dream Wicket Virat Kohli IND vs SL
Dunith Wellalage Dream Wicket Virat Kohli IND vs SLDainik Gomantak

Dunith Wellalage Dream Wicket Virat Kohli IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2023 च्या सुपर-4 सामन्यादरम्यान एका 20 वर्षीय गोलंदाजाने आपला जलवा दाखवला.

श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागेच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी कात टाकली. वेलालागेने शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 40 धावा देत 5 बळी घेतले.

त्याने रोहित शर्माला 53, शुभमन गिलला 19, विराट कोहलीला 3, केएल राहुलला 39 आणि हार्दिक पांड्याला 5 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

वेलालागेने 5 विकेट घेतल्या असतील, पण त्याची ड्रीम विकेट कोणती होती? याबाबत त्यानेच आता खुलासा केला आहे.

विराट कोहलीची विकेट 'ड्रीम विकेट' होती

डावाच्या विश्रांतीदरम्यान वेलालागे म्हणाला - मला माझे प्रशिक्षक आणि मॅनेजमेंटचे आभार मानायचे आहेत. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचे विशेष आभार. मी नॉर्मल व्हेरिएशनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि धावा दिल्या नाहीत.

यानंतर वेलालागेने आपल्या ड्रीम विकेटबाबतचा खुलासा केला. वेलालागे पुढे म्हणाला- माझी ड्रीम विकेट विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट होती.

रंगना हेराथनशी तुलना केली जाते

दरम्यान, वेलालागेची तुलना श्रीलंकेचा दिग्गज रंगना हेराथशी केली जात आहे. वेलालागे हा डाव्या हाताचा संथ ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे.

विशेष म्हणजे, वेलालागेने आपल्या होम ग्राउंडवर करिष्माई गोलंदाजी केली. त्याचा जन्म 9 जानेवारी 2003 रोजी कोलंबो येथे झाला. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकलेल्या वेलालागेने अफगाणिस्तानला आशिया कपमधून बाहेर पडण्यातही योगदान दिले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 36 धावांत 2 बळी घेतले होते. त्याने श्रीलंका अंडर-19 आणि श्रीलंका A संघांसाठीही चमकदार कामगिरी केली आहे.

यासोबतच त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून चमकदार कामगिरी केली. तो श्रीलंकेतील स्थानिक कोल्ट्स क्रिकेट क्लबकडूनही खेळतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले

वेलालागेने यापूर्वी कसोटी पदार्पण केले आहे. गतवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) गॉलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती.

गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याने 7 षटकांत 2 बळी घेतले होते.

वेलालागेने याआधी 12 एकदिवसीय सामन्यात 13 बळी घेतले आहेत. तो फलंदाजीतही माहिर आहे. त्याने प्रथम श्रेणीमध्ये 78 धावांची नाबाद खेळीही खेळली आहे.

विशेष म्हणजे, वेलालागेचा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com