IND vs ZIM: लाइव्ह मॅचदरम्यान इशान किशनच्या चुकीमुळे संतापलेला अक्षर पटेल, मागितली माफी Video

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 5 विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
IND vs ZIM
IND vs ZIMDainik Gomantak

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 5 विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) इशान किशनला (Ishan Kishan) फटकारताना दिसून येत आहे. लाईव्ह मॅचदरम्यान इशान किशनने असे काही केले की अक्षर पटेल रागाने लाल झाला होता. मात्र, इशानने आपल्या चुकीबद्दल अक्षर पटेलची माफी देखील मागितली. (IND vs ZIM Video of Axar Patel angry over Ishan Kishan mistake during live match goes viral)

IND vs ZIM
ZIM vs IND ODI: भारताचे झिम्बाब्वे विरोधातील मालिकेवर वर्चेस्व

झिम्बाब्वेच्या डावाच्या 28व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. हुडाच्या दुसऱ्या चेंडूवर बुर्लेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट खेळला आणि दोन धावा काढल्या, तिथे तैनात असलेल्या इशान किशनने थ्रो फेकला तेव्हा तो शॉर्ट कव्हरवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलच्या जवळून गेला, इशानने थ्रो फेकला तेव्हा अक्षरने लागू नये म्हणून डोक्यावर हात ठेवला. मात्र, चेंडू अक्षर पटेलला लागला नाही पण त्याच्यापासून काही अंतरावर पडला , पण यामुळे पटेल रागाने लाल झाले.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या वनडे सामन्यातही निराशा केली म्हणायला हरकत नाही. संघ 38.1 ओव्हरमध्ये 161 धावांमध्ये आटोपला, तर प्रत्युत्तरात भारताने 25.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 167 धावा करत सामना आपल्या नावावर केला.

162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) रूपाने बसला. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी कर्णधार केएल राहुलने शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) फलंदाजीच्या सरावासाठी डावाची सुरुवात केली पण दुसऱ्याच ओव्हमध्ये व्हिक्टर न्युचीने पाच चेंडूमध्ये एक रन काढून त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यानंतर धवन आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी खेळी झाली. तसेच 29 चेंडूत 42 धावांची शानदार भागीदारी झाली.

IND vs ZIM
ZIM vs IND ODI: भारताचे झिम्बाब्वे विरोधातील मालिकेवर वर्चेस्व

मात्र, 21 चेंडूत 33 धावा करून धवन आऊट झाला तर तिसर्‍या विकेटसाठी इशान किशन आणि गिल यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली होती, मात्र किशन अवघ्या 6 धावा करून बोल्ड झाला. तर गिलही 34 चेंडूत 33 धावा केल्यानंतर काही वेळाने आऊट झाला.

दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 58 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली तर हुड्डा 36 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसनने 26व्या ओव्हर ठोकत भारताला विजय मिळवून दिला. सॅमसनने 39 चेंडूत 43 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com