Ind W Vs Aus W: शतकी खेळी करत स्मृती मंधानाची विक्रमांना गवसणी

कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.
Ind W Vs Aus W: शतकी खेळी करत स्मृती मंधानाची विक्रमांना गवसणी
Smriti MandhanaTweeter / @ICC

Ind W Vs Aus W: भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट (Gold Coast) येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस/रात्र कसोटीत (D/N Test) शतक झळकावून इतिहास रचला आहे. कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय फलंदाज आहे. याशिवाय, कांगारूंच्या भूमीवर शतक झळकावणारी ती पहिलीच आशियायी महिला फलंदाज आहे.

चौकारने केले शतक पूर्ण ...

स्मृती मंधानाने खणखणीत चौकार खेचत आपले शतक पूर्ण केले. तिने ऑस्ट्रेलियाची गोलंदाज इलियास पेरीच्या गोलंदाजीवर चौकार मारून मंधानाने आपले पहिले कसोटी शतक 170 चेंडूत पूर्ण केले. तिच्या शतकाद्वारे टीम इंडिया मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना गार्डनरच्या गोलंदाजीवर ताहिला मॅग्राथकडे झेल देऊन बाद झाली.

Smriti Mandhana
टी -20 विश्वचषकासाठी Universal Bossची IPL मधून माघार

तीनही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर करणारी स्मृती मंधाना पहिली महिला खेळाडू ठरली. कांगारू महिला संघाविरुद्ध तिची वैयक्तिक धावसंख्या कसोटीत नाबाद १२७ धावा झाली, तर एकदिवसीय सामन्यात 102 धावा आणि T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत 66 धावा आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारी परदेशी खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी स्मृती मंधाना जगातील पहिली फलंदाज बनली आहे. तिने 124 धावा करताच ही कामगिरी केली. यामध्ये मंधानाने मॉली हाइडला मागे टाकले.

भारतीय महिला संघाची पहिली दिवस/रात्र कसोटी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध गोल्ड कोस्ट येथे खेळली जाणारी कसोटी भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला दिवस/रात्र सामना आहे. तर कांगारू संघ आपली दुसरी दिवस/रात्र कसोटी खेळत आहे. यापूर्वी कांगारू महिला संघाने इंग्लंडविरुद्ध गुलाबी बॉल कसोटी खेळली आहे.

Related Stories

No stories found.