U19 Asia Cup 2021 च्या अंतिम फेरीत भारत अन् पाकिस्तान आमने-सामने ?

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या या हंगामाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना रंगू शकतो, असे संकेत मिळाले आहेत.
India vs Pakistan

India vs Pakistan

Dainik Gomantak 

U19 आशिया कप 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या दोन संघांची घोषणा सोमवार 27 डिसेंबर रोजी करण्यात आली. तर दोन्ही संघ मंगळवारी 28 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अ गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या या हंगामाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगू शकतो, असे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, पाकिस्‍तानने (pakistan) U19 आशिया कप 2021 मोसमाच्‍या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून गट 1 मधील तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर भारताने (India) तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होईल आणि पाकिस्तान कोणत्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीत खेळेल हे स्पष्ट नाही. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan</p></div>
U-19 Asia Cup: भारताच्या युवा स्टार्सचा शानदार विजय, उपांत्य फेरीत मारली धडक!

जर भारत आणि पाकिस्तान या संघांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकले आहेत. तर 31 डिसेंबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या 19 वर्षाखालील आशिया चषक 2021 च्या अंतिम सामन्यात ते एकमेकांशी भिडतील, जिथे भारतीय संघाला पाकिस्तानला पराजित करण्याची संधी आहे. तसेच आणखी एक ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल. साखळी सामन्यातील रोमहर्षक सामन्यात पाकिस्तान संघाने भारताचा 2 गडी राखून पराभव केला.

यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात यजमान यूएईचा 154 धावांच्या फरकाने पराभव केला, तर भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, साखळी टप्प्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात, अंडर-19 टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानचा (afghanistan) 4 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. इथे भारताचा सामना ब गटातील गुणतालिकेत अव्वल संघाशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com