भारतीय महिलांचे वर्चस्व कायम
India-Australia Indian women continue to dominate Dainik Gomantak

भारतीय महिलांचे वर्चस्व कायम

ऑस्ट्रेलियाविरूद्धची महिलांची कसोटी मात्र अनिर्णित अवस्थेकडे

गोल्ड कोस्ट: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) महिलांमध्ये प्रकाशझोतात होत असलेला कसोटी सामना अनिर्णित राहणार हे आता निश्चित झाले आहे, पण तीन दिवसांच्या खेळावर भारतीयांनी कमालीचे प्रभुत्व गाजवले आहे.

India-Australia Indian women continue to dominate
खेळाडूंसाठी अमेय ठरलाय ‘शक्तिवर्धक’

गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. भारताच्या 8 बाद 377 या धावसंख्येसमोर ऑस्ट्रेलियाची 4 बाद 143 अशी अवस्था झाली आहे; मात्र उद्या अखेरचा दिवस आहे.

स्मृती मंधानाच्या शतकाने सुरू झालेले भारताचे वर्चस्व कायम राहिले. पहिल्या दिवशी पावसाळी वातावण असताना आणि भारतीयांवर दडपण टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी दिली, परंतु दोन दिवसांच्या खेळानंतरही त्यांना भारताचा डाव बाद करता आला नाही. भारताने अखेर 8 फलंदाज बाद झाल्यावर डाव घोषित केला.

India-Australia Indian women continue to dominate
“प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मेंटर धोनी टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर पोहोचवतील ”

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना जे जमले नाही ते भारताच्या झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकार या वेगवान गोलंदाजांनी करून दाखवले. या दोघींनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव ः 8 बाद 377 घोषित (स्मृती मंधाना 127, शेफाली वर्मा 31, पूनम राऊत 36, मिताली राज 30, दीप्ती शर्मा 66, एलिस पेरी 76-2, स्टेला कॅम्पबेल 47-2, मॉलिनेक्स 45-2). ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः 4 बाद 143 (अलिसा हिली 29, मेग लेनिंग 38, एलिस पेरी 27, ताहिला मॅकग्रा 28, जुलन गोस्वामी 27-2, पूजा वस्त्रकार 31-2)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com