'भारत - ऑस्ट्रेलिया'च्या टी २० लढतीही हाऊसफुल?

India-Australia T20 match also getting houseful as restrains on the number of audience have released
India-Australia T20 match also getting houseful as restrains on the number of audience have released

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्‌वेंटी २० लढतीस हाऊसफुल उपस्थिती असण्याची शक्‍यता आहे. ही लढत सिडनीत ८ डिसेंबरला आहे. सिडनीत असलेल्या न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध दूर केले आहेत. राज्यात तीन आठवड्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करण्यासाठी असलेल्या नियमात शिथिलता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होईल, त्यामुळे अखेरच्या ट्‌वेंटी २० लढतीच्यावेळी ४८ हजार क्षमतेचे सिडनी क्रिकेट ग्राऊंड हाऊसफुल होण्याची शक्‍यता आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्‌वेंटी २० मालिका शुक्रवारपासून होईल. सलामीचा सामना कॅनबेरातील मनुका ओव्हल मैदानावरच होईल. त्यानंतरच्या दोन लढती सिडनीत होणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील या सामन्यासाठी क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवेशच देण्यात आला होता. ही सर्व तिकिटे काही तासांत संपली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्याची उर्वरित ५० टक्के तिकिटेही सहज संपण्याचा अंदाज आहे. पूर्ण क्षमतेने तिकीट विक्रीस मंजुरी मिळाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया खूष आहेत. जैवसुरक्षित उपाययोजना, तसेच प्रेक्षक मर्यादेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियास ८ कोटी ८० लाख डॉलरचा फटका बसला आहे. आता तिसरी कसोटीही सिडनीत होणार असल्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची ऑस्ट्रेलियास आशा आहे. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com