IND vs PAK: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! 228 धावांनी पाकिस्तानचा पराभव

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 च्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.
Team India: IND vs PAK
Team India: IND vs PAKDainik Gomantak

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 च्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या.

केएल राहुल आणि विराट कोहली यांनी शानदार शतके झळकावली. तर दुसरीकडे, पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

357 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 8 विकेट गमावल्या. पाकिस्तानच्या डावाच्या 11व्या षटकात पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. यानंतर तब्बल तासाभरानंतर सामना सुरु झाला होता.

सुपर-4 सामन्यात भारताने PAK चा पराभव केला

दरम्यान, कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला.

भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 50 षटकांत 2 बाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाची धावसंख्या 32 षटकात 8 विकेट गमावत 128 धावा असताना भारताला विजयी घोषित करण्यात आले.

दुखापतीमुळे पाकिस्तानचे नसीम शाह आणि हरिस रौफ हे दोन खेळाडू फलंदाजीला आले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे भारताने (India) पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.

Team India: IND vs PAK
IND vs PAK: केएल राहुलचं दणदणीत कमबॅक! पाकिस्तानवर हल्ला चढवत ठोकली सहावी सेंच्यूरी

रोहित आणि गिलची 121 धावांची भागीदारी

आर प्रेमदासा स्टेडियमवर कोहलीचे हे सलग चौथे शतक आहे. रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना मध्यातच थांबवावा लागला होता. दरम्यान, अर्धवट राहिलेला हा सामना आज ( सोमवारी) खेळवण्यात आला.

काल भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. अर्धशतके झळकावण्याबरोबरच सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा (56) आणि शुभमन गिल (58) यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची शानदार भागीदारी केली होती. त्यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती.

मात्र, भारताने लागोपाठ षटकांत दोन्ही विकेट गमावल्या. रोहित 17 व्या षटकात फिरकी गोलंदाज शादाब खानच्या चेंडूवर फहीम अश्रफकरवी झेलबाद झाला, तर शाहीनच्या गोलंदाजीवर गिल आगा सलमानकरवी झेलबाद झाला.

सोमवारी सामना एक तास 40 मिनिटे उशिराने सुरु झाला

सोमवारीही पावसामुळे सामना एक तास 40 मिनिटे उशिराने सुरु झाला. दरम्यान, राहुल सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.

कोहलीने दिवसाचा पहिला चौकार नसीम शाहच्या गोलंदाजीवर लगावला. इफ्तिखार अहमदच्या लागोपाठ चेंडूंवर षटकार आणि चौकार मारल्यानंतर राहुलने फिरकीपटूच्या पुढच्याच षटकात दोन चौकार मारले. अशाप्रकारे राहुलने 60 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Team India: IND vs PAK
IND vs PAK: पाकिस्तानला रातोरात तगडा झटका! भारताविरुद्ध एक गोलंदाज कमी घेऊन खेळणार, कारण...

कोहली आणि राहुलने धावांचा पाऊस पाडला

कोहलीने 43 व्या षटकात इफ्तिखारला पहिला षटकार मारला आणि त्याच षटकात चौकारही मारला. तर दुसरीकडे, राहुलने 45 व्या षटकात फहीमच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि एक धाव घेत भारताची धावसंख्या 300 धावांवर नेली.

दुखापतीनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या राहुलने नसीम शाहच्या गोलंदाजीवर दोन धावा करत 100 चेंडूत शतक पूर्ण केले. तर दुसरीकडे, 98 धावा पूर्ण केल्यानंतर कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करणारा भारताचा दुसरा आणि जगातील पाचवा फलंदाज ठरला.

त्याच्याआधी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (18426), श्रीलंकेचा कुमार संगकारा (14234), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (13704) आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (13430) यांनी ही कामगिरी केली आहे.

Team India: IND vs PAK
IND vs PAK: रोहित आफ्रिदीविरुद्ध 'हिट'! पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स ठोकत रचला इतिहास

दुसरीकडे, कोहलीने भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. कोहली आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी झाली. याआधी नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांनी 1996 मध्ये शारजाहमध्ये 231 धावांची भागीदारी केली होती.

ही दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी असली तरी. 2005 मध्ये कोची येथे राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी झाली होती. मात्र कोहली-केएलने मिळून हा विक्रम मोडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com