प्रतिभावान खेळाडू नसल्यानेच भारत पाकिस्तानशी खेळत नाही: अब्दुल रज्जाक

पाकिस्तानमध्ये (Pakistan) ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती अतुलनीय आहे. ती भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) ती प्रतीभा नाही. मला वाटत नाही की भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकेल.
प्रतिभावान खेळाडू नसल्यानेच भारत पाकिस्तानशी खेळत नाही: अब्दुल रज्जाक
अब्दुल रज्जाक याचे भारतीय (India) संघाबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्यDainik Gomantak

पाकिस्तानचा (Pakistan) माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) त्याच्या स्फोटक विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी भारताला (India) लक्ष्य करत त्यांने एक बालिश विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध स्पर्धा करू शकत नाही. भारतीय क्रिकेट संघाचे (Indian cricket team) पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध चांगले नसण्याचे कारण म्हणजे त्यांना माहित आहे की भारतीय संघ सरासरीच आहे.

अब्दुल रज्जाक याचे भारतीय (India) संघाबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
सुशिक्षित देशांनी भारताचे अनुकरण करु नये, शाहिद आफ्रिदीची आगपाखड

पाकिस्तानातील एका माध्यमाशी बोलताना रज्जाक म्हणाले, भारताकडे पाकिस्तानसारखे वेगवान गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू आहेत, असे तुम्हाला वाटचे का? पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती अतुलनीय आहे. ती भारतीय क्रिकेट संघात ती प्रतीभा नाही. मला वाटत नाही की भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकेल. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचे खेळाडू आहेत, ते भारतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. एक गोष्ट चांगली आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने होत नाहीत. कारण या सामन्यात खेळाडूंना दबाव हाताळण्याची एक उत्तम संधी असायची. पण आता या दोन्ही संघात सामने होत नसल्याने ती संधी आता मिळत नाही. मला असे वाटते की जर हे असेच चालू राहिले तर लोकांना हे समजले असते की पाकिस्तानकडे कोणत्या प्रकारची प्रतिभा आहे, जी भारताकडे नाही.

अब्दुल रज्जाक याचे भारतीय (India) संघाबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
IPL 2021: 'मैं पाकिस्तान जा रहा हूं' म्हणत गेलने क्रिकेटप्रेमींना केले आश्चर्यचकित

रझाकचे हे विधान फक्त भारत आणि पाकिस्तानच्या सध्याच्या क्रिकेटपटूंपुरते मर्यादित नाही. त्यांचा विश्वास आहे की गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेटने भारतापेक्षा चांगले खेळाडू निर्माण केले आहेत. त्यांनी दोन्ही देशांसाठी खेळलेल्या काही महान खेळाडूंविषयी चर्चा केली. भारताला पाकिस्तानला सामोरे जायचे नाही हे यामागील खरे कारण आहे. भारताचा संघही चांगला होता. त्यांच्याकडे चांगले खेळाडूही होते. आमच्याकडे इम्रान खान होते तर भारताकडे कपिल देव होते. पण इम्रान खान हे उत्तम खेळाडू होते. आमच्या संघात वसीम अक्रम होते, पण भारताकडे त्यांच्या तोडीचा असा कोणताही खेळाडू नव्हता.

यावेळी त्यांनी खेळाडूंची अनेक खेळाडूंची नावे घेतली. तो म्हणाला, “आमच्याकडे जावेद मियांदाद होते. तर भारताकडे सुनील गावसकर पण या दोन खेळाडूंमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही. आमच्याकडे इंझमाम-उल-हक, मोहम्मद युसूफ, युनूस खान आणि शाहिद आफ्रिदी होते. भारताकडे राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग होते. एकूणच, तुम्हाला दिसेल की पाकिस्तानने भारतापेक्षा चांगले खेळाडू निर्माण केले आहेत. कदाचित हेच कारण आहे की भारत आमच्याविरुद्ध खेळत नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com