IND vs SL: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा बोलबाला, श्रीलंकेचा किल्ला ध्वस्त

Team India: कोलकात्यातच भारताने मालिका जिंकली आहे. अशा स्थितीत त्रिवेंद्रममध्ये होणारा तिसरा सामना श्रीलंकेसाठी लाजिरवाणा ठरेल.
KL Rahul
KL Rahul Dainik Gomantak

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला, ज्यात यजमान भारतीय संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने या मालिकेवरही कब्जा केला आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. कोलकात्यातच भारताने मालिका जिंकली आहे. अशा स्थितीत त्रिवेंद्रममध्ये होणारा तिसरा सामना श्रीलंकेसाठी लाजिरवाणा ठरेल.

दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ केवळ 215 धावा करु शकला. संघाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. भारताने श्रीलंकेला 39.4 षटकांत 215 धावांत गुंडाळले. श्रीलंकेकडून नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

KL Rahul
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियात मोठा बदल, तर श्रीलंकेनेही दोघांना वगळलं, पाहा Playing XI

त्याचवेळी भारताने (India) 216 धावांचे लक्ष्य 43.2 षटकात पूर्ण केले. यादरम्यान भारताने 6 विकेटही गमावल्या, पण केएल राहुलचे नाबाद अर्धशतक प्रभावी ठरले. हार्दिक पांड्या 53 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. संघाकडून श्रेयस अय्यरने 28 धावा केल्या. या कमी धावसंख्येच्या सामन्यात केएल राहुलने खूप मेहनत घेतली. त्याने 103 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com