२०२२ आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भारत २०२२ मध्ये आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद प्रथमच भूषवणार आहे. आता त्याच वर्षी जागतिक फुटबॉल महासंघाने भारतास विश्वकरंडक १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपदही दिले आहे. 

मुंबई :  भारत २०२२ मध्ये आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद प्रथमच भूषवणार आहे. आता त्याच वर्षी जागतिक फुटबॉल महासंघाने भारतास विश्वकरंडक १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपदही दिले आहे. 

कोरोना आक्रमणामुळे भारतात २०२० मध्ये होणारी विश्वकरंडक १७ वर्षांखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरमध्ये होणारी ही स्पर्धा २०२१ च्या फेब्रुवारी - मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती; पण अखेर ती रद्द करण्यात आली. आशियाई फुटबॉल महासंघाने या वर्षाच्या सुरुवातीस २०२२ च्या आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारतास दिले आहे. ही स्पर्धा ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये होईल. स्पर्धेतील लढती अहमदाबाद आणि नवी मुंबईत होण्याची शक्‍यता 
आहे.  विश्वकरंडक सतरा वर्षांखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा रद्द झाली असली, तरी त्या स्पर्धेसाठी होत असलेल्या स्टेडियमचा वापर २०२२ च्या स्पर्धेसाठी होऊ शकेल, असा विश्वास भारतीय फुटबॉल महासंघास आहे.

संबंधित बातम्या