असं काही घडलं की... थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय खेळाडूंची माफी

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात असे काही प्रकरण घडले की थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंनी माफी मागावी लागली.

सिडनी: सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात असे काही प्रकरण घडले की थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंनी माफी मागावी लागली. तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात खेळ थांबविण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज याला डिवचल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यां संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असं कधी होत नाही.
  
सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळ करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज याला शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. काही प्रेक्षकांना ग्राउंडणधून बाहेर सुद्धा काढण्यात आलं होतं. यानंतर तिसर्‍या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात पुन्हा खेळ सुरू झाला. या सगळ्या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागीतली, अशा चाहत्यांची गय केली जाणार नाही असही सांगितलं.

“भारतीय खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्ती बद्दल आम्ही पूर्ण विरोधात आहोत. या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो”, असं अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

आणखी वाचा:

INDvsAUS : बॉर्डर-गावसकर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड, टीम इंडिया अडचणीत -

तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांची भारतीय खेळाडूंवर वर्णभेदी शेरेबाजी -

संबंधित बातम्या