Asia Cup 2022 : आशिया चषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा आमने सामने

T20 वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच येणार आमने सामने
Asia Cup 2022 : आशिया चषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा आमने सामने

भारत पाकिस्तानचा (India-Pakistan) सामना म्हटले की अवघ्या जगाचं लक्ष या सामन्याकडे लागल्याले असते. T20 वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. आशिया चषकात भारत-पाकिस्तान तब्बल तीन वेळा एकमेंकासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. बऱ्याच कालावधीनंतर एकमेंकासमोर येणाऱ्या या संघात तुल्यबळ लढत पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे या समान्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Asia Cup 2022 : आशिया चषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा आमने सामने
Madgaon : लिंडन परेरा यांचा मडगावच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा

आशिया कपला 27 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. ग्रुप स्टेज मधील सामने 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2022 to commence from 27 August)

भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (Sri-lanka, Bangladesh And Afghanistan) हे संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. त्यामुळे हाँगकाँगचा (Hongkong) खेळ पाहता 'ग्रुप ए' मधून भारत आणि पाकिस्तानच पुढील फेऱीत जाण्याची दाट शक्यता आहे.

ग्रुप बी मधील देखील श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान या साऱ्यांच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानचा फॉर्म पाहता दोघेच सुपर फोर मध्येही आघाडीवर राहू शकतात. त्यामुळे भारत, पाकिस्तान दोघेही आशिया चषकात चांगले खेळल्यास अंतिम सामना देखील या दोन्ही संघात पाहायला मिळू शकतो.

Asia Cup 2022 : आशिया चषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा आमने सामने
हणजुण समुद्रकिनाऱ्यालगतची बेकायदा अतिक्रमणे हटवली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com