
Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 चा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळवला जात आहे. पावसामुळे (रविवारी) सामना नियोजित वेळेत होऊ शकला नाही. त्यामुळे आज राखीव दिवशी हा सामना खेळवला जात आहे.
आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या.
आज राखीव दिवशी सुरु झालेल्या या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली यांनी तूफानी फलंदाजी केली. पाकिस्तानी गोलंदाजांचा या जोडीने चांगलाच समाचार घेतला.
आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करणार्या भारतीय संघाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या.
भारताने (India) पाकिस्तानला 357 धावांचे लक्ष्य दिले. केएल राहुल आणि विराट कोहली नाबाद परतले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानने 1-1 विकेट घेतली.
दरम्यान, आशिया कप 2023 च्या सुपर-4 सामन्यात टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीची विस्फोटक शैली पाकिस्तानविरुद्ध पाहायला मिळाली.
विराटने शानदार शतक झळकावले. 84 चेंडूत विराटने आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 47 वे शतक आहे.
केएल राहुलने आपल्या विस्फोटक फलंदाजीने कोलंबोमध्ये खळबळ उडवून दिली. राहुलने 6 महिन्यांनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला. राहुलने आशिया कप 2023 च्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून मोठी कामगिरी केली.
दुसरीकडे, कोहलीने भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रमही केला. कोहली आणि केएल राहुल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी झाली.
याआधी नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांनी 1996 मध्ये शारजाहमध्ये 231 धावांची भागीदारी केली होती. ही दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी असली तरी.
2005 मध्ये कोची येथे राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी झाली होती. कोहली-केएलने मिळून हा विक्रम मोडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.