भारताच्या या स्टार खेळाडूला दुबईचा 'गोल्डन व्हिसा'

जीव मिल्खाला ( Jeev Milkha) 10 वर्षांसाठी प्रतिष्ठित दुबई गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे.
India Star Golfer Jeev Milkha Singh get UAE golden visa
India Star Golfer Jeev Milkha Singh get UAE golden visaDainik Gomantak

भारताचा स्टार गोल्फर (India Star Golfer) जीव मिल्खा सिंगच्या (Jeev Milkha Singh) आयुष्यात आणखी एका कामगिरीची भर पडली आहे. दुबई गोल्डन व्हिसा (UAE Golden Visa) मिळवणारे ते जगातील पहिले व्यावसायिक गोल्फर बनले आहेत. जीव मिल्खाला 10 वर्षांसाठी प्रतिष्ठित दुबई गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे.(India Star Golfer Jeev Milkha Singh get UAE golden visa)

जीवचा दुबईशी दीर्घ संबंध आहे. त्याने इथे अनेक स्पर्धा खेळत त्या जिंकल्या देखील आहेत. त्याला या शहरात बरेच मित्र आहेत. "मी सन्मानित आहे की दुबई सरकारने गोल्डन व्हिसासाठी माझ्या नावाचा विचार केला आहे आणि मी येथे आणखी विशेष आठवणी निर्माण करण्यास उत्सुक आहे," असे जीवने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

युरोपियन टूरवर चार, जपान गोल्फ टूरवर चार आणि एशियन टूरमध्ये सहा जेतेपद पटकावणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीला उच्चभ्रू व्यावसायिक खेळाडू म्हणून 10 वर्षांचे 'गोल्ड कार्ड' देण्यात आले आहे. जीव म्हणाला, 'हा एक मोठा सन्मान आहे. मला वाटते मी 1993 मध्ये प्रथम दुबईला आलो आणि इथे घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेतला आहे .

India Star Golfer Jeev Milkha Singh get UAE golden visa
ENG vs IND: पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर माजी खेळाडूंच्या संतप्त प्रतिक्रिया

यूएई सरकारने 2019 मध्ये गोल्डन व्हिसा आणला होता ज्यामध्ये गुंतवणूकदा, उद्योगपती तसेच व्यावसायिक, विज्ञान आणि क्रीडा सारख्या क्षेत्रातील तज्ञ अर्ज करू शकतात.आणि किमान 10 दशलक्ष युएई दरहम गुंवणूकदेखील करू शकतात.

मिल्खाच्या आधी, ज्या खेळाडूंना दुबईने गोल्डन व्हिसा दिला आहे त्यामध्ये फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, पॉल पोग्बा, रॉबर्टो कार्लोस, लुईस फिगो आणि रोमेलू लोकाकू, टेनिस सुपरस्टार नोवाक जोकोविच, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा समावेश आहे. बॉलिवूड स्टार्स शाहरुख खान आणि संजय दत्त यांनाही हा व्हिसा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com