भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिकेची घोषणा: वाचा कधी होणार कोणता सामना

कांगारू संघ सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसह T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी पूर्ण करेल.
Team India
Team IndiaDainik Gomantak

अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia Cricket Team) या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये भारत(India) दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी (T 20 World Cup) ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 3-3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि न्यूझीलंडचे (, New Zealand) यजमानपद भूषवणार आहे. आणि त्यानंतर कांगारू संघ सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसह T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी पूर्ण करेल. यावर्षी 16 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. (IND vs AUS 3-match t20i series)

ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत (Indian Cricket Team) दौरा 2018-19 मध्ये केला होता. त्यानंतर 3 टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न भारताविरुद्धची पहिली टी-20 मालिका जिंकण्याचा असेल. जर ऑस्ट्रेलियन संघ टी-20 विश्वचषकापूर्वी हे करण्यात यशस्वी ठरला तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढेल. भारत दौऱ्यानंतर लवकरच ऑस्ट्रेलियन संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध 3-3 टी-20 मालिका खेळणार आहे. (Australia to tour India for 3-match T20I series)

Team India
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव आयपीएल 2022 मधून बाहेर

2023 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया 4 कसोटी सामन्यांची मालिका

T20 विश्वचषकानंतर पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जेव्हा ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये अंतिम कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. त्यानंतर कांगारू संघाला 4 कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली होती. 2013 मध्ये, भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. ऑस्ट्रेलियाने भारतात शेवटची कसोटी मालिका 2004-05 मध्ये जिंकली होती.

T20 विश्वचषकाच्या वेळापत्रकासाठी आणि संघ

T20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 साठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानएका गटात आहे. तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत. पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर-12 फेरीत पोहोचतील. स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामने 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील. स्पर्धेची दुसरी फेरी म्हणजेच सुपर-12 फेरी 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा होणार आहे. हा सामना सिडनी येथे होणार आहे.

Team India
जसप्रीतने मोडले KKRचे कंबरडे, 9 बॉल 5 विकेट, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगीरी

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट वेळापत्रक

  • जून-जुलै 2022: श्रीलंका दौरा (3xT20, 3xODI, 2xTests)

  • ऑगस्ट-सप्टेंबर 2022: झिम्बाब्वे (3xODI) आणि न्यूझीलंड (3xODI)

  • सप्टेंबर 2022: भारतात व्हाइट बॉल मालिका (3xT20

  • ऑक्टोबर 2020: इंग्लंड (6xT20)

  • ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022: T20 विश्वचषक

  • नोव्हेंबर 2022: इंग्लंड (3xODI)

  • डिसेंबर-जानेवारी 2022-23: वेस्ट इंडिज (2xT20) आणि दक्षिण आफ्रिका (3xTests, 3xODI)

  • फेब्रुवारी-मार्च 2023: भारताचा कसोटी दौरा (4xटेस्ट)

  • मार्च-मे 2023: इंडियन प्रीमियर लीग(IPL)

  • जून-जुलै 2023: इंग्लंडचा ऍशेस दौरा (5xटेस्ट, ODI अपेक्षित)

  • ऑगस्ट 2023: दक्षिण आफ्रिकेचा कसोटी दौरा (3xटेस्ट)

  • ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023: ODI विश्व कप भारतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com