KL Rahul: 'अप्रतिम खेळी...', टीममधून काढा म्हणणाऱ्या वेंकटेशकडूनच केएलला कौतुकाचा 'प्रसाद'

India vs Australia: केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई वनडेत केलेल्या मॅचविनिंग खेळीनंतर वेंकटेश प्रसादने त्याचे कौतुक केले आहे.
Venkatesh Prasad | KL Rahul
Venkatesh Prasad | KL RahulDainik Gomantak

Venkatesh Prasad Praises KL Rahul: भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 5विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात केएल राहुलने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याचे कौतुक होत असून वेंकटेश प्रसादनेही त्याच्याबद्दल ट्वीट केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत वाईट झाली होती. भारताने 39 धावांतच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण अशा परिस्थितीत केएल राहुलला संयमी खेळ केला. त्याने आधी हार्दिक पंड्या आणि नंतर रविंद्र जडेजाला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला.

Venkatesh Prasad | KL Rahul
Venkatesh Prasad: 'तो टॉप 10 ओपनर्समध्येही...': KL राहुल पुन्हा प्रसादच्या निशाण्यावर

केएल राहुलने हार्दिकबरोबर पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. हार्दिक 25 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर जडेजाने केएल राहुलची चांगली साथ देताना सहाव्या विकेटसाठी 108 धावांची नाबाद शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताने 39.5 षटकात 5 विकेट्स गमावत 191 धावा करत पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताकडून केएल राहुल 91 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच रविंद्र जडेजाने 69 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. 

त्यामुळे वेंकटेश प्रसादने केएल राहुल आणि जडेजा यांचे कौतुक केले आहे. सामन्यानंतर प्रसादने ट्वीट केले की 'दबावाच्या परिस्थितीत शांतचित्त राहत केएल राहुलने शानदार खेळी केली. अप्रतिम खेळी. रविंद्र जडेजानेही सुरेख साथ दिली आणि हा भारतासाठी चांगला विजय होता.'

Venkatesh Prasad | KL Rahul
KL Rahul बरोबरच आता द्रविड, रोहितवरही वेंकटेश प्रसादचा निशाणा! थेट आकडेवारीतूनच आणलं सत्य बाहेर

वेंकटेश प्रसादने केली होती टीका

खरंतर या वनडे मालिकेपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. या मालितील पहिल्या दोन कसोटीत केएल राहुल धावा करण्यात अपयशी ठरला होता. तसेच त्यापूर्वी तो फारसा चांगल्या लयीत नव्हता.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींदरम्यान वेंकटेश प्रसादने केएल राहुलवर तिखट टीका केली होती. त्याने केएल राहुलच्या संघातील जागेवरच प्रश्न उपस्थित केले होते. तसेच केएल राहुलची कसोटीतील आकडेवारीही त्याने शेअर करत टीका केली होती. त्याला अन्य खेळाडूंना डावलून पसंती दिली जात असल्याचाही आरोप केला होता. त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती.

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच त्याला भारतीय संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com