IND vs AUS 2nd ODI: कडकच! स्टीव्ह स्मिथ बनला सुपरमॅन, हवेत सूर मारत पकडला हार्दिकचा सुरेख कॅच

India vs Australia 2nd ODI: स्टीव्ह स्मिथने हार्दिक पंड्याचा हवेत सूर मारत एका हाताने कॅच घेत सर्वांचेच लक्ष वेधले होते.
Steve Smith
Steve SmithDainik Gomantak

Steve Smith Stunning Catch: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणममध्ये दुसरा वनडे सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व ठेवक सहज 10 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचे नेतृत्व आणि त्याचे क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सुरुवातीलाच मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत 9 षटकातच चार मोठे धक्के दिले. यादरम्यान, त्याच्या गोलंदाजीवर 5 व्या षटाकात स्मिथने भारताचा कर्णधार रोहितचा शानदार झेल घेतला.

पण, यापेक्षाही सुरेख झेल स्मिथने हार्दिक पंड्याचा घेतला. स्मिथने 10 व्या षटकात चेंडू सीन ऍबॉटकडे सोपवला. स्टार्कने निर्माण केलेल्या दबावाच्या परिस्थितीचा त्यानेही फायदा घेत हार्दिक पंड्याला चकवले.

Steve Smith
IND vs AUS 2nd ODI: टीम इंडियाचे शेर दुसऱ्या वनडेत ढेर! ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकली मॅच

त्यावेळी 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. त्यावेळी पहिल्या स्लीपमध्ये स्मिथ क्षेत्ररक्षण करत होता. त्याच्यापासून चेंडू बऱ्यापैकी लांब होता. पण त्याने त्याच्या डावीकडे हवेत सूर मारत एकाच हाताने हा चेंडू पकडला.

त्यामुळे हार्दिकला केवळ 1 धाव करून माघारी परतावे लागले. स्मिथने घेतलेल्या या झेलाचे कौतुक अनेक माजी क्रिकेटपटूंनीही केले आहे.

हार्दिकच्या विकेटने भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यांनंतरही भारतीय संघाची फलंदाजी फार काळ टीकली नाही आणि भारताचा संघ 26 षटकात 117 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्या. अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

Steve Smith
IND vs AUS: अखेर 'या' खेळाडूनं विराटला केलं आऊट, 13 वर्षे वाट पाहावी लागली!

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 5 विकेट्स घेतल्या, तर सीन ऍबॉटने 3 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 118 धावांच्या आव्हानाचा पाठलगा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सलामीला ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांची जोडी उतरली. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना 11 षटकातच 121 धावांनी नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्शने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच हेडने नाबाद 51 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com