IND Vs AUS: टीम इंडियाला नागपुरात बसू शकतो मोठा झटका, हे कारण आले समोर

IND vs AUS 2nd T20: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभवाने सुरुवात करावी लागली.
IND Vs AUS
IND Vs AUSDainik Gomantak

India vs Australia 2nd T20I at Nagpur: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभवाने सुरुवात करावी लागली. मोहालीत खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडियासमोर 'करो या मरो' ची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हवामान टीम इंडियासाठी अडचणी निर्माण करु शकते.

नागपुरात पावसाची शक्यता

या मालिकेत टिकण्यासाठी टीम इंडियाला (Team India) नागपुरात होणारा टी-20 सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र, नागपुरात पावसाची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत सामना रद्दही करावा लागू शकतो. Weather.com नुसार, संध्याकाळी 5 च्या सुमारास पाऊस पडू शकतो. याशिवाय संध्याकाळी 7 वाजल्यापासून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सामनाही संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.

IND Vs AUS
IND vs AUS 2nd T20: टीम इंडियासाठी आज 'करा किंवा मरो' सामना, जाणून घ्या प्लेइंग-11 मध्ये कोण असेल

दुसरीकडे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी नागपुरात (Nagpur) पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते 11 च्या दरम्यान ढगाळ वातावरण असेल आणि या दरम्यान पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत पूर्ण 40 षटकांचा सामना खेळणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे षटकेही कमी टाकावी लागू शकतात. नंतर दव पडण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

IND Vs AUS
IND Vs AUS: दुसऱ्या T20 साठी टीम इंडियात या विस्फोटक खेळाडूची अचानक एन्ट्री!

भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघाचा चार विकेट्सनी पराभव झाला. यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत यजमान संघ 0-1 ने पिछाडीवर पडला आहे. यातच आज संध्याकाळी नागपुरात होणारा पुढचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर टीम इंडियाचे अधिक नुकसान होईल. अशा स्थितीत रविवारी होणारा तिसरा टी-20 सामना जिंकून भारताला मालिकेत बरोबरी साधता येणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने (Australia) विजय मिळवला तर मालिकाही त्यांच्या नावावर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com