INDIAvsAUSTRALIA : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सावध सुरूवात, आस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या भारत विरूद्ध आस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची ४ बाद १२६ ही धावसंख्या होती.

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या भारत विरूद्ध आस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची ४ बाद १२६ ही धावसंख्या होती. कॅमरून ग्रीन आणि लाबुशेंज खळत आहेत. त्याआधी अश्विनच्या गोलंदाजीवर जडेजाने सुरेख झेल पकडत मॅथ्यू वेड ला पॅव्हेलिअनमध्ये परत पाठवलं. बीसीसीआयने काल  आपल्या ट्विटरवरून या संघाची घोषणा केली आहे. कर्णधार विराट रोहली मायदेशी परतल्याने कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ३६ धावांत खुर्दा उडाल्यामुळे मोठी घसरण झालेल्या भारतीय संघाला आता फिनिक्‍स भरारीच घ्यावी लागणार आहे. विराट कोहली आणि महम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. यात शुभमन गिल आणि महम्मद सिराज असे दोघेजण पदार्पण करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मेलबर्नला मिळवलेल्या विजयात विराट कोहली (८२ पहिल्या डावात), रोहित शर्मा (नाबाद ६३) यांनी फलंदाजीत मोठे योगदान दिले होते; तर ईशांत शर्मा आणि महम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवल्या होत्या. हे चारही जण उद्यापासून सुरू होत असलेल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्यांची उणीव कोण आणि कशी भरून काढणार, यावर भारताची मदार असणार आहे.

समतोल साधण्याचा प्रयत्न
भारतीय संघाने संघ निवडीत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र जडेजाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करताना सातव्या क्रमांकापर्यंत भरवशाचे फलंदाज असतील, याचा विचार केला. त्याच वेळी हनुमा विहारीला आणखी एक संधी देताना केएल राहुलचा विचार केला नाही. जडेजाच्या समावेशामुळे तीन वेगवान आणि दोन फिरकी अशा एकूण पाच गोलंदाजांसह भारत खेळणार आहे.  

     मालिकेतील स्थिती ः भारताची ०-१ पिछाडी

  •      गेल्या पाच कसोटीत - ऑस्ट्रेलियाचा पाचही कसोटीत विजय, तर भारताचे तीन पराभव आणि दोन विजय.
  •      हवामानाचा अंदाज - पहिल्या दिवशी आल्हाददायक हवामान, तर दुसऱ्या दिवशी ३३ अंश. या दिवशी संध्याकाळी पावसाचीही शक्‍यता. अखेरच्या तीनही दिवशी सरासरीपेक्षा खूपच कमी तपमान. 
  •      खेळपट्टीचा अंदाज - फलंदाज तसेच गोलंदाजांना प्रामुख्याने समान साथ. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मध्यमगती गोलंदाजांना जास्त साथ. 

 

 लक्षवेधक - 

  •     भारताचा यापूर्वीच्या मेलबर्न कसोटीत १३७ धावांनी विजय. या कसोटीत अर्धशतक केलेले रोहित शर्मा तसेच विराट कोहली संघात नाहीत
  •      ऑस्ट्रेलियाचा गेल्या सहाही कसोटीत विजय
  •      परदेशात एकाच कसोटी संघात भारतीय संघात दोन पदार्पणवीर असण्याची ही २००१ पासूनची ही दुसरीच वेळ
  •      २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विरेंद्र सेहवाग, दीप दासगुप्ताचे पदार्पण
  •      भारत आणि ऑस्ट्रेलियातील ही शंभरावी कसोटी. भारताचे २८ विजय आणि ४३ पराभव. एक कसोटी बरोबरीत

ठिकाण -  एमसीजी, मेलबर्न
थेट प्रक्षेपण - पहाटे पाचपासून सोनी सिक्‍स, सोनी टेन वन आणि सोनी टेन थ्री. 

संबंधित बातम्या