IND vs AUS: 'झुकेगा नही साला...', कसोटी जिंकताच ऑसी फॅनने भारतीय चाहत्यांना डिवचलं; Video Viral

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरला झालेल्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन चाहत्याची 'पुष्पा' रिऍक्शन व्हायरल झाली आहे.
Australian Fan
Australian FanDainik Gomantak

India vs Australia: इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेतील भारताची आघाडीही 2-0 अशी कमी केली.

दरम्यान, हा कसोटी सामना पाहाण्यासाठी इंदूरच्या स्टेडियममध्ये अनेक चाहते उपस्थित होते. यातीलच एका ऑस्ट्रेलियन चाहत्यांने सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात भारतीय संघ संघर्ष करताना पाहून या युवा ऑस्ट्रेलियन चाहत्याने प्रसिद्ध चित्रपट 'पुष्पा'मधील ट्रेडमार्क ऍक्शन करताना 'झुकेगा नहीं साला' हा डायलॉगही म्हटला.

त्यावेळी त्याच्या आजूबाजूला अनेक भारतीय चाहतेही होते. या युवा ऑस्ट्रेलियन चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Australian Fan
Ind Vs Aus: PM मोदी अहमदाबाद टेस्टचा लुटणार आनंद, टीम इंडियाची लागणार कसोटी

दरम्यान, या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी अवघ्या ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या षटकातच केवळ 1 विकेट गमावत पूर्ण केला.

या संपूर्ण सामन्यातच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले होते. त्यांनी या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 109 धावांवर संपुष्टात आला. तसेच नंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 197 धावा करत 88 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतरही भारतीय संघाला दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 163 धावांवर रोखले होते. त्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर केवळ 76 धावांचे आव्हान ठेवता आले.

Australian Fan
IND vs AUS, 3rd Test: ऑस्ट्रेलियाने इंदूरचं मैदान मारलं! भारताचा 9 विकेट्सने लाजीरवाणा पराभव

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे त्यांनी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पण अंतिम सामन्यासाठी आता भारतीय संघाची प्रतिक्षा लांबली आहे.

भारताला अंतिम सामन्यात थेट प्रवेशासाठी आता 9 मार्चपासून अहमदाबादला होणाऱ्या चौथ्या कसोटीत विजय मिळवणे गरजेचेच असणार आहे. पण जर भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला किंवा सामना अनिर्णित राहिला, तर मात्र भारताला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com