INDvsAUS : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची भक्कम आघाडीकडे वाटचाल, पावसाचा व्यत्यय

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ हा अत्यंत रोमांचकारी वळणावर पोहोचला आहे.

 ब्रिस्बेन -  ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ हा अत्यंत रोमांचकारी वळणावर पोहोचला आहे. दुसरं सत्र संपेपर्यत ऑस्ट्रेलियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 243 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशीची दुसरा डाव संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने बाद 149 अशी मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाकडे सध्या 276 धावांची आघाडी आहे.

चौथ्या दिवशी सुरूवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी चांगला खेळ करत केला . हॅरिसनं 8 आणि डेव्हिड वॉर्नरनं 6 चौकार मारले. तिसऱ्या दिवशी दमदार खेळ केलेले शार्दुल ठाकूर आणि सुंदर यांनी टीम इंडियाला विकेट मिळवून दिल्या.

शार्दुलने हॅरिसला तर सुंदरने डेव्हिड वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं . डेव्हिड वॉर्नरनं 48 तर हॅरिसनं 38 धावा केल्या. मोहम्मद सिराजने मार्नस लाबुशेन (25) आणि मॅथ्यू वेड (0) यांचीही विकेट घेत, दमदार खेळ केला. त्यानेच  मोठी विकेट घेत स्मिथला 55 धावांवर आऊट केलं.त्यानंतर शार्दुल ठाकूरने >> कॅमरून ग्रीन ३७ कर्णधार टीम पेन (27) यांना आऊट करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद 242 अशी केली. दरम्यान, पावसाचा व्यत्यय आल्याने सध्या खेळ थांबविण्यात आला आहे. 

 

 

.

संबंधित बातम्या