INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना निर्णायक टप्प्यावर; पुजारावर नजरा खिळल्या

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने आत्तापर्यंत 3 विकेट्सच्या मोबदल्यात  अशी धावसंख्या उभारली आहे.

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने आत्तापर्यंत 3 विकेट्सच्या मोबदल्यात  अशी धावसंख्या उभारली आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 30 ओव्हर्समध्ये 134 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. आता सगळ्यांच्या नजरा या चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर खिळून आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 44 आणि रिषभ पंत 16  धावांवर खेळत आहेत. 

आज चांगला खेळ केलेल्या शुभमन गीलला शतकाने हुलकावणी दिली. त्याला 146 चेंडूत 91 धावा करता आल्या. त्याच्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे 24 धावा करत स्वस्तात परतला.  आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं. पॅट कमिन्स रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरला. रोहित शर्माला 7 धावा करता आल्या. 

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावांचं आव्हान कोणीही पार केलेलं नाही. तसंच, गल्या 100 वर्षात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा हा रेकॉर्ड टीम इंडिया मोडणार का, याकडे साऱ्या क्रिकेटजगताचं लक्ष आहे. 

संबंधित बातम्या