INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान कॉंटे की टक्कर; शुभमन गीलचा अर्धशतकी तडाखा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

 ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीच्या आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं.

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीच्या आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं. पहिल्या सत्रअखेर भारताच्या 1 बाद 83 धावा झाल्या होत्या. पॅट कमिन्स रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरला. रोहित शर्माला 7 धावा करता आल्या.

 सध्या पाचव्या दिवसाचं दुसरं सत्र सुरू झालं असून, शुभमन गील 139 चेंडूंमध्ये  89 आणि चेतेश्वर पुजारा 118 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे. त्यामुळे भारताची धावसंख्या 127 वर 1 बाद अशी झाली असून, भारताला जिंकण्यासाठी 54 ओव्हर्समध्ये 201 धावांची गरज आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाला टेस्ट सिराजदेखील जिंकता येणार आहे.

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीचा कलाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दिलेलं 328 धावांचं आवाहन स्विकारत टीम इंडिया मैदानात उतरली होती. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळत होते, काल 1.5 षटकांचा खेळ झाला होता.

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावांचं आव्हान कोणीही पार केलेलं नाही. तसंच, गल्या 100 वर्षात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा हा रेकॉर्ड टीम इंडिया मोडणार का, याकडे साऱ्या क्रिकेटजगताचं लक्ष आहे. 

संबंधित बातम्या