INDvsAUS : ब्रिस्बेन कसोटी जिंकत टीम इंडियाने मोडला ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणारा चौथा कसोटी सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली.

ब्रिस्बेन :  रिषभ पंतने शेवटच्या सत्रात केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणारा चौथा कसोटी सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांनी शेवटच्या क्षणी सुरेख खेळी करत 18 चेंडू राखून भारताला सामना जिंकून दिला. भारताने 3 गडी राखत हा सामना जिंकला. 

या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडित काढला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावांचं आव्हान कोणीही पार केलं नव्हतं. भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ही किमया करून दाखवली. रिषभ पंत 89 तर नवदिप सैनी 0 धावा करून नाबाद राहिले. आज चांगला खेळ केलेल्या शुभमन गीलला शतकाने हुलकावणी दिली. त्याला 146 चेंडूत 91 धावा करता आल्या. त्याच्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे 24 धावा करत स्वस्तात परतला.  आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं.

पॅट कमिन्स रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरला. रोहित शर्माला 7 धावा करता आल्या. टीम इंडियाच्या फलंदाजांनी अनुक्रमे रोहित शर्मा 7, शुभमन गील 91, अजिंक्य रहाणे 24  चेतेश्वर पुजारा 56 , रिषभ पंत 89 ,मयांक अगरवाल 9, वॉशिंग्टन सुंदर 22 धावा केल्या. 

संबंधित बातम्या