INDvsAUS : चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची चांगली सुरूवात ; ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्या

INDvsAUS : चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची चांगली सुरूवात ; ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्या
India vs Australia 4th Test Day 1 Brisbane Gaba Steve Smith Wahington Sundar Ajinkya Rahane

ब्रिस्बेन - ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताने चांगली सुरूवात केली. महत्तवाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने  भारतीय संघात बरेच बदल केरण्यात ले आहेत, काही नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

सध्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचं दुसरं सत्र सुरू असून, ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 111 धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीली आलेले डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरी लवकर बाद झाले. शार्दुल ठाकुरने हॅरिसला 5 धावांवर बाद करत आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामधील आपली पहिली विकेट घेतली. तर वॉशिंग्टन सुंदरनी स्टिव्ह स्मिथची मोठी विकेट मिळवून दिली. तो 36 धावा तरून तंबूत परतला. सध्या मॅथ्यू वेड 5 आणि मार्नस लबूशेन 45  धावांवर खेळत आहे.

असा आहे भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर

असा आहे  ऑस्ट्रेलिया संघ : टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com