INDvsAUS : चौथ्या कसोटीत टीम इंडियाची परिस्थीती बिकट, फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी  भारताची निराशाजनक सुरूवात झाली.

ब्रिस्बेन : ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताची निराशाजनक सुरूवात झाली. भारताचे कर्णधार अजिंक्य रहाणे 37 व चेतेश्वर पुजारा 25  धावा काढून स्वस्तात तंबूत परतले आसून, पहिल्या सत्रापर्यंत भारतीय संघाने 4 बाद 161 धावा केल्या होत्या.

मुंबई सिटीने दोन गुण गमावले ;  प्रभावी हैदराबादने गोलशून्य बरोबरीत रोखले

कसोटीचा कालचा दुसरा दिवस हा पावसामुळे संपूर्ण खेळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आहेत. त्याआधी भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गील अनुक्रमे 44 व 7 धावा काढून आऊट झाले.

भरवशाचे मयंक अग्रवाल व रिषभ पंतदेखील आऊट झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली असून, टीम इंडिया अजूनही 170 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या भारताची 6 बाद 207 धावा अशी अवस्था असून, वॉशिंग्टन सुंदर 8 तर, शार्दुल ठाकूर 14 धावांवर खेळत आहे.

 

संबंधित बातम्या