IND vs AUS: टीम इंडियाचं टेंशन वाढणार! 'या' कारणामुळे चौथ्या कसोटीतही स्मिथ करणार कांगारुंचं नेतृत्व?

अहमदाबादला होणाऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्ध नेतृत्व करू शकतो.
Steve Smith
Steve Smith Dainik Gomantak

Steve Smith: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला 9 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

दरम्यान, चौथ्या कसोटीत देखील स्टार फलंदाज स्टीव्ह फलंदाज ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता दाट आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अद्याप भारतात परतलेला नाही.

Steve Smith
Steve Smith: कॅप्टन स्मिथची चलाखी! भारताला नेस्तनाभूत करताना Cricket नियमांमध्ये शोधली 'ही' पळवाट

तो दुसऱ्या कसोटीनंतर त्याची आई आजारी असल्याने मायदेशी परतला होता. त्यामुळे तो तिसरा कसोटी सामनाही खेळला नाही. त्याच्या ऐवजी संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या सामन्यात नेतृत्व केले होते.

महत्त्वाचे म्हणजे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर स्मिथच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तिसऱ्या कसोटीत स्मिथचे नेतृत्वही चांगले राहिले होते. त्याच्या नेतृत्वाचे अनेक दिग्गजांनीही कौतुक केले होते.

लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे स्मिथने आत्तापर्यंत भारतात 5 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यातील 2 सामने त्याने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर त्याने 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

कमिन्सच्या सतत संपर्कात - अँड्र्यू मॅकडोनल्ड

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी माहिती दिली आहे की सध्या कमिन्स सातत भारतात असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या संपर्कात आहे.

त्यांनी माहिती दिली की 'तो आत्ता त्याच्या घरी काही गोष्टींचा सामना करत आहे. पण तरी तो सातत्याने या संघाच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत. आम्ही रोज त्याच्याशी संपर्क साधत आहोत. सध्या तो इथे आलेला नाही आणि अद्याप पुढील कसोटी सामन्याला काही दिवस आहेत. त्यामुळे आम्ही पॅटबद्दल चर्चा करू.' त्यामुळे आता कमिन्सच्या उपस्थितीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

Steve Smith
Steve Smith: स्मिथने चौथ्यांदा जिंकला 'हा' मानाचा पुरस्कार; पाँटिंग, क्लार्कच्या यादीत समावेश

स्मिथकडे नेतृत्वाचा अनुभव

दरम्यान, स्मिथने जरी आता ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होण्याची महत्त्वकांक्षा नसल्याचे सांगितले असले, तरी कमिन्सच्या अनुपस्थितीत उपकर्णधार या नात्याने तोच चौथ्या कसोटीतही नेतृत्व करू शकतो.

स्मिथने तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर कर्णधारपदाबद्दल बोलताना स्पष्ट केले होते की 'माझी वेळ आता संपली असून आता हा पॅट कमिन्सचा संघ आहे.'

तसेच त्याने भारतात नेतृत्व करायलाही मजा येते असे सांगितले होते. तो म्हणाला, 'मी या आठवड्यात नेतृत्व केले होते, कारण कमिन्स घरी गेला आहे. आमच्या संवेदना त्याच्याबरोबर आहेत. भारत असे ठिकाण आहे, जिथे मला नेतृत्व करायला आवडते. कदाचीत नेतृत्व करण्यासाठी जगातील माझे सर्वात आवडते ठिकाण आहे.'

स्मिथने यापूर्वी 2014 ते 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियाचे नियमितपणे नेतृत्व केले होते. पण चेंडू छेडछाडी प्रकरणात त्याला त्याचे कर्णधारपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्याला आता पुन्हा कसोटी संघाचे उपकर्णधार करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com