IND vs AUS: स्मिथ-रोहितसारख्या दिग्गजांनाही जमलं नाही, ते अक्षर पटेलनं करून दाखवलं, पाहा रेकॉर्ड्स

India vs Australia: अहमदाबाद कसोटीत खेळताना अक्षर पटेलने तिसरे अर्धशतक झळकावले आहे.
Axar Patel
Axar PatelDainik Gomantak

Axar Patel Fifty: अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात 571 धावांचा डोंगर उभा करत 91 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताकडून या डावात विराट कोहली (186) आणि शुभमन गिल (128) यांनी शतके केली. तसेच अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 113 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना विराट कोहलीबरोबर 162 धावांची भागीदारीही केली.

Axar Patel
Axar Patel: क्रिकेटर अक्षरने जिच्यासोबत बांधली रेशीमगाठ, ती आहे तरी कोण ?

अक्षरचे हे चालू कसोटी मालिकेतील तिसरे अर्धशतक आहे. त्यामुळे तो या मालिकेत तीन अर्धशतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत देखील अर्धशतके केली होती. त्याने पहिल्या कसोटीत 84 आणि दुसऱ्या कसोटीत 74 धावांची खेळी केली होती.

इतकेच नाही, तर अक्षर आता चालू कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या मालिकेत 4 सामन्यांमधील 5 डावात 3 अर्धशतकांसह 88 च्या सरासरीने 264 धावा केल्या आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर सध्या उस्मान ख्वाजा आहे. ख्वाजाने 4 सामन्यातील 7 डावात 47.57 च्या सरासरीने 333 धावा केल्या आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर विराट असून त्याने 4 सामन्यातील 6 डावात 297 धावा केल्या आहेत.

Axar Patel
Axar Patel Marriage: गर्लफ्रेंडला 'मान मेरी जान' म्हणत थिरकला अक्षर, लग्नातील Video व्हायरल

भारताकडे चौथ्या दिवसाखेर आघाडी

या सामन्याचा चौथा दिवस संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 षटकात बिनबाद 3 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमन शुन्यावर आणि ट्रेविस हेड 3 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे अद्याप भारतीय संघाकडे 88 धावांची आघाडी आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपुष्टात आला होता. या डावात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके ठोकले होते. ख्वाजाने 180 आणि ग्रीनने 114 धावांची शतकी खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com