India vs Australia: शमी-जड्डूनं केले मोठे काटे दूर, तेही थेट क्लिन बोल्ड, पाहा Video

Viral Video: अहमदाबाद कसोटीत मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांना क्लिन बोल्ड करत स्वस्तात माघारी धाडले.
Marnus Labuschagne | Steve Smith
Marnus Labuschagne | Steve Smith Dainik Gomantak

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर गुरुवारपासून (9 मार्च) सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या डावात चांगली झुंज दिली होती. मात्र, तरी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलियन संघाला मोठे धक्के देण्यात यश मिळवले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियन संघाकडून ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीसाठी उतरले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवातही दिली. या दरम्यान हेडला एक जीवदानही मिळाले. पण त्याला त्याचा फायदा घेता आला नाही आणि तो 32 धावांवर 16 व्या षटकात बाद झाला.

Marnus Labuschagne | Steve Smith
IND vs AUS: 'हिटमॅन'ला मोठ्या विक्रमाची संधी! धोनी, अझरला मागे टाकत गावसकरांची करू शकतो बरोबरी

त्यानंतर मात्र मोहम्मद शमीने मार्नस लॅब्युशेनला स्वस्तात माघारी धाडले. खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्नात असलेल्या लॅब्युशेनला 23 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने त्रिफळीचीत केले. त्यामुळे लॅब्युशेन केवळ 3 धावांवर माघारी परतला.

यानंतर मात्र कर्णधार स्टीव्ह स्मिथने ख्वाजाची चांगली साथ दिली. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचली. त्यांची भागीदारी रंगत असताना आणि ही जोडी भारतीय संघासाठी धोका ठरत असताना जडेजा मदतीला धावला. त्याने धोकादायक वाटणाऱ्या स्मिथला 64 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फिरकीत अडकवले. जडेजाने टाकलेल्या चेंडूवर स्मिथ 135 चेंडूत 38 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला.

शमीने नंतर पाचव्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेला पीटर हँड्सकॉम्ब फार काळ टीकणार नाही याची काळजी घेतली. त्याने त्याला 71 व्या षटकात 17 धावांवर असतानाच त्रिफळाचीत केले.

Marnus Labuschagne | Steve Smith
IND vs AUS: दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाणेफेक! 'अशी' आहे दोन्ही संघांची Playing XI

भारताला 80 व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या या चारच विकेट्स घेता आल्या होत्या. त्यातही तीन विकेट्स त्रिफळीचीत होत्या. दरम्यान, ख्वाजाने मात्र एक बाजू सांभाळताना अर्धशतकी खेळीही साकारली असून तो आता शतकाकडे वाटचाल करत आहे.

पहिल्या दिवशी दोन्ही देशांच्या पतंप्रधानांची हजेरी

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. त्यांनी यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला स्पेशल कॅप प्रदान केली, तसेच दोन्ही संघांतील खेळाडूंचीही भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com