शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! Shubman Gill चा यावर्षी पाचव्यांदा शतकी धमाका, मोठ्या विक्रमालाही गवसणी

India vs Australia: अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलने शतकी खेळी करत खास विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Shubman Gill Century
Shubman Gill CenturyDainik Gomantak

Shubman Gill Century: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून अहमदबादला सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात युवा भारतीय सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात शुभमन गिलने आक्रमक खेळी करताना 194 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने यावेळी 10 चौकार आणि 1 षटकार खेचला. गिलचे हे कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.

Shubman Gill Century
Viral Video: कहर चाहता! Gill च्या षटकाराने चेंडू हरवला, पण पठ्ठ्यानं कव्हरच्या आत शिरून शोधून काढला

त्याचबरोबर गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच शतक केले आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा खेळाडू ठरला आहे. त्याने ज्यादिवशी हे शतक केले, त्यावेळी त्याचे वय 23 वर्षे 182 दिवस इतके होते.

त्याने या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले आहे. लक्ष्मणने 25 वर्षे 62 दिवस इतके वय असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक केले होते. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर केएल राहुल आहे. राहुलने 22 वर्षे 263 दिवस वय असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक केले होते.

एकाच वर्षात ५ शतके

गिलचे हे 2023 वर्षातील पाचवे शतक आहे. त्याने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये 3 शतके केली आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या द्विशतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही त्याने न्यूझीलंडविरुद्ध यावर्षी शतक केले. त्यानंतर आता त्याने कसोटीतही शतक केले आहे. त्यामुळे 2023 वर्षात तो 5 शतके करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

Shubman Gill Century
IND vs AUS: 'देशासाठी खेळताय...', चालू ओव्हरमध्ये जखमेवर उपचार करणाऱ्या Shubman Gill वर भडकले गावसकर

रोहित-पुजाराबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी

दरम्यान, अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलने ही शतकी खेळी करताना आधी कर्णधार रोहित शर्माबरोबर 74 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित 35 धावांवर बाद झाल्यानंतर त्याने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. त्यामुळे या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा दुसरे सत्र संपले, तेव्हा भारताने 2 बाद 188 धावा केल्या होत्या. पुजारा 42 धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com