INDvsAUS : चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियावर संक्रांत,ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचं ग्रहण

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेन इथं खेळवला जाणार आहे.

ब्रिस्बेन : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेन इथं खेळवला जाणार आहे. रवींद्र जडेजा, अश्विन आणि हनुमा विहिरी हे महत्वाचे शिलेदार दुखापतग्रस्त आहेत.भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह,रिषभ पंत हेदेखील दुखापतग्रस्त झाला आहेत. उमेश यादव आधीच दुखापत झाल्याने मायदेशी परतला आहे. 

१५ जानेवारीपासून ब्रिस्बेन इथं होणाऱ्या भारत - ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी आधी महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता आहे, नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

रविचंद्रन अश्विन , जसप्रीत बुमराह ,मयंक अग्रवाल , ऋषभ पंत, मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी, केएल राहुल, आणि हे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या खेळाडूऐवजी कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर,टी नटराजन, शार्दुल ठाकूर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

भारताबरेबरच ऑस्ट्रेलिया संघाला देखील एका दुखापतीचा फटका बरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यात खेळू शकणार नाही. तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी विल पुकोव्हस्कीच्या हाताला गंभीर इजा झाली. त्याच्या जागी मार्कस हॅरीसला संघात घेण्यात आलं आहे. मार्कस हॅरिस डेव्हिड वॉर्नरसोबत चौथ्या सामन्यात सलामीला येणार आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या