INDvsAUS : ऐतिहासिक विजयासाठी भारताला 328 धावांची गरज

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीचा आजचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला.

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीचा आजचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दिलेलं 328 धावांचं आवाहन स्विकारत टीम इंडिया मैदानात उतरली होती. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळत होते, आज 1.5 षटकांचा खेळ झाला आहे.

आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी  चांगला खेळ केला.  डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस यांनी 89 धावांची भागिदारी केली. दुसऱ्या सत्रात स्टिव स्मिथने 55 धावा केल्या. कर्णधार पेन (27)  कॅमरुन ग्रीन(37) डेव्हिड वॉर्नर (48), हॅरिस (38) लाबुशेन (25) यांनी धावसंख्या वाढवण्यास मदत केली. भारताच्या मोहम्मद सिराजनं दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजच्या माऱ्यामुळे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 294 धावा करता आल्या. 

विराटने केला ट्विटर बायोमध्ये बदल ; भारतीय क्रिकेटर हा शब्द काढला

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावांचं आव्हान कोणीही पार केलेलं नाही. तसंच, गल्या 100 वर्षात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा हा रेकॉर्ड टीम इंडिया मोडणार का, याकडे साऱ्या क्रिकेटजगताचं लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली असल्यामुळे चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला 328 धावांची गरज आहे. 

संबंधित बातम्या